'नोकिया' कंपनीतही घुसला कोरोना, 42 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्लांट बंद

'नोकिया' कंपनीतही घुसला कोरोना, 42 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्लांट बंद

नोकियाने गेल्या आठवड्यात त्यांचा तामिळनाडूमध्ये श्रीपेरंबुदूर याठिकाणी असणार प्लांट बंद केला आहे. काही कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर नोकियाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

  • Share this:

श्रीपेरंबुदूर, 27 मे : गेल्या दशकामध्ये भारतात सर्वाधिक मोबाइल फोन बनवणारी कंपनी नोकिया (Nokia) ने त्यांचा तामिळनाडूमधील मॅन्युफॅक्चरिंग प्लांंट बंद केला आहे. याठिकाणी काम करणाऱ्या 42 कर्मचाऱ्यांना कोरोना (Coronavirus) झाल्याने कंपनीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी चिनी स्मार्टफोन बनवणारी कंपनी ओपो (Oppo) ने देखील 8 कर्मचारी पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर त्यांची फॅक्टरी पुढील आदेश येईपर्यंत बंद केली आहे. या प्रकरणानंतर ओपोने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये बंद असेलेले कामकाज कंपनीने 8 मे रोजी सुरू केले होते.

Reuters ने दिलेल्या वृत्तानुसार नोकियाने गेल्या आठवड्यात त्यांचा तामिळनाडूमध्ये श्रीपेरंबुदूर याठिकाणी असणार प्लांट बंद केला आहे. काही कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर नोकियाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

(हे वाचा-कोट्यवधी ग्राहकांना SBI चा झटका! एफडी व्याजदरात मोठी कपात, वाचा काय आहेत नवे दर)

कंपनीकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही आहे की किती कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. मात्र वृत्तसंस्था Reuters ने असा दावा केला आहे की, नोकियामध्ये 42 कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सुरुवातीपासूनच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन केले होते. त्याचप्रमाणे कंपनीकडून कँटिन सर्व्हिसमध्ये देखील काही बदल घडवून आणले होते. सुरक्षेचे नियम लक्षात ठेवून कंपनीने गेल्या काही दिवसांपूर्वीच कंपनीतीतल व्यवहार पुन्हा सुरू केले होते. नोकिया कंपनीने असा दावा देखील केला आहे की, कर्मचाऱ्यांच्या मदतीने आम्ही लवकरच सर्व व्यवहार सुरळीत सुरू करू.

(हे वाचा-लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमती उतरल्या, जाणून घ्या काय आहेत बुधवारचे दर)

संकलन, संपादन - जान्हवी भाटकर

First published: May 27, 2020, 4:32 PM IST

ताज्या बातम्या