Home /News /money /

खूशखबर! लॉकडाऊनमध्ये Google, Amazonमध्ये कामाची संधी, 2 लाख नोकऱ्या देणार या कंपन्या

खूशखबर! लॉकडाऊनमध्ये Google, Amazonमध्ये कामाची संधी, 2 लाख नोकऱ्या देणार या कंपन्या

गेल्या 4 आठवड्यांपासून जगभरातील काही नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये गुगल, अ‍ॅमेझॉन, टेक महिंद्रा, वॉलमार्ट, आयबीएम, केपजेमिनी, डेलाइट, ग्रोफर्स आणि बिग बास्केट यांचा समावेश आहे.

    मुंबई, 21 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. परिणामी या देशांमधील महत्त्वाचे व्यवहार ठप्प असल्यामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. मात्र या काळातच एक चांगली बातमी समोर येत आहे. गेल्या 4 आठवड्यांपासून जगभरातील काही नामांकित कंपन्यांमध्ये 2 लाख नोकऱ्या उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये गुगल, अ‍ॅमेझॉन, टेक महिंद्रा, वॉलमार्ट, आयबीएम, केपजेमिनी, डेलाइट, ग्रोफर्स आणि बिग बास्केट यांचा समावेश आहे. 91 टक्के नोकऱ्या फुलटाइम महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार स्टाफिंग सोल्युशन फर्म एक्सफेनोच्या निरिक्षणाअंती या नोकऱ्यांपैकी 91 टक्के नोकऱ्या फुलटाइम असण्याची शक्यता आहे. बाकी नोकऱ्या कॉन्ट्रॅक्ट आणि पार्ट टाइम असण्याची शक्यता आहे. या नोकऱ्यांपैकी 79 टक्के नोकऱ्या आयटी आणि संबधित क्षेत्रातील आहेत. तर 15 टक्के नोकऱ्या ई-कॉमर्स आणि बँकिंग, विमा क्षेत्रातील आहेत. (हे वाचा-Crude Oil Crash नंतर पेट्रोल दर घटणार? वाचा तुमच्या खिशावर होणारे परिणाम) यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वाधिक जाहीराती सॉफ्टवेअर इंजिनीअर, सॉफ्टवेअर प्रोग्रामर्स आणि फुल स्टॅक डेव्हलपर्स साठीआहेत. नॉन टेक्निकल जॉबमधील सर्वाधिक नोकऱ्या सेल्स एक्सिक्यूटीव्ह पदांसाठी आहेत. त्याचप्रमाणे काही कंपन्यांमधील 80000 नोकऱ्या एंट्री लेव्हलवरील आहेत. त्यामुळे नोकरी शोधणाऱ्यांना आणि फ्रेशर्सना याचा मोठा फायदा होऊ शकतो. तर 40 टक्के नोकऱ्या वरिष्ठ आणि कनिष्ठ पदांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एकंदरित सर्व स्तरांवर नोकरीची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. (हे वाचा-सोनं वा शेअर बाजारात नाही तर इथे करा गुंतवणूक,होईल करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण) काही कंपन्यांच्या एचआर ने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊन संपल्यानंतर ज्यावेळी कारभार पुन्हा सुरू होतील तेव्हा आवश्यक कर्मचारी कंपनीमध्ये उपलब्ध राहावेत याकरता या नोकऱ्यांच्या जाहीराती देण्यात आल्या आहेत. डेलाइटचे मुख्य टॅलेंट ऑफिसर एस. व्ही. नाथन यांनी दिलेेल्या माहितीनुसार त्यांच्या कंपनीमध्ये नवीन भरतीवर कोणतीही मर्यादा आलेली नाही आहे. केवळ सध्याच्या परिस्थितीमध्ये नोकरभरतीची गती काहीशी कमी झाली आहे. येणाऱ्या काळात नोकरभरतीवर अधिक भर देण्यात येईल. केपजेमिनीच्या प्रवक्त्यांनीही आवश्यकतेनुसार भरती होईल अशी माहिती दिली आहे. टेक महिंद्राचे चीफ पीपल ऑफिसर  हर्षवेंद्र सोईन यांनी सांगितलं की आम्हाला नव्या टॅलेंटचा शोध घ्यायचा आहे आणि केवळ विशेष कौशल्यांसाठी बाहेरून भरती केली जाईल. डिजीटल कंटेटमध्ये मागणी वाढली एक्सफेनोचे सहसंस्थापक कमल कारंत यांच्या मते गेमिंग, एज्यूकेशन, डिजीटल कंटेट आणि ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी कंपन्यांनी याआधीच नवीन भरती सुरू केली आहे. लॉकडाऊनमध्ये डिजीटल कंटेट त्याचप्रमाणे ई-लर्निंग सेवांमध्ये वाढ होत आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या