Home /News /money /

सोनं किंवा शेअर बाजारात नाही तर इथे करा गुंतवणूक, होईल करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण

सोनं किंवा शेअर बाजारात नाही तर इथे करा गुंतवणूक, होईल करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण

कोरोनाच्या संकटकाळात सरकारच्या स्मॉल सेव्हिंग्स स्कीम्स (Small Savings Schemes) मध्ये बचत करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्ही 1 कोटी पेक्षा जास्त पैशांची बचत करू शकाल.

  नवी दिल्ली, 19 एप्रिल : देशामध्ये 3 मेपर्यंत लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत देशाची आर्थिक स्थिती ढासळू नये याकरता सर्वजण प्रयत्नशील आहेत. कोरोना (Coronavirus)च्या संकटातून देशाला वाचवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांचे विविध प्रयत्न सुरु आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा लोकांची विविध योजना नागरिकांच्या फायद्यासाठी सुरू करत आहे. सध्या विविध प्रकारच्या व्याजदरांमध्ये तर कपात होतच आहे. त्याचप्रमाणे इक्विटी मार्केटमध्ये सुद्धा चांगले रिटर्न्स मिळत आहेत. (हे वाचा-कोरोनामुळे अगणित आर्थिक नुकसान! 3 मेपर्यंत GoAirचे 90% कर्मचारी बिनपगारी रजेवर) त्याचप्रमाणे कोरोनामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे झाले आहे. सोन्याच्या किंमती सुद्धा गगनाला भीडत आहे. दरम्यान या परिस्थितीत सरकारच्या स्मॉल सेव्हिंग्स स्कीम्स (Small Savings Schemes) मध्ये बचत करणे एक चांगला पर्याय ठरू शकतो. यातून एकप्रकारे चांगला रिटर्न गुंतवणूकदारांना मिळू शकतो. कमी जोखीम आणि मोठी बचत या स्मॉल सेव्हिंग स्कीम्सपैकी एक आहे ते म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF- Public Provident Fund). PPF ची खास गोष्ट म्हणजे यामध्ये केलेल्या गुंतवणुकीतून बँक किंवा एफडीमध्ये केलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक व्याज मिळते. तर यामध्ये सोनं किंवा शेअर मार्केटमधील गुंतवणुकीपेक्षा कमी जोखीम आहे. त्याचप्रमाणे या योजनेतून सरकारी गॅरंटी देखील मिळते. त्यामुळे कमी जोखीम पत्करून तुम्ही मोठी बचत करू शकता. पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास इनकम टॅक्स कायदा सेक्शन 80C अंतर्गत टॅक्समध्ये सूट देखील मिळेल. त्यामुळे भविष्यासाठी बचत तर होईलच पण त्याचबरोबर टॅक्स देखील वाचेल. योग्य नियोजन केल्यास या योजनेअंतर्गत तुम्ही 1 कोटी रुपयांची बचत करू शकता. कशी कराल 1 कोटींची बचत? केंद्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या माहितीनुसार पीपीएफवर 7.1 टक्के व्याज मिळत आहे. पीपीएफ कॅलक्यूलेटर (PPF Calculator)नुसार कोणतीही व्यक्ती 15 वर्ष वयाची असल्यापासून दर महिन्याला या योजनेत 6 हजार रुपयांची गुंतवणूक करत असेल तर 35 वर्षांनंतर निवृत्तीवेळी ही रक्कम एक कोटींपेेक्षा जास्त होईल. सौजन्य- पैसा बाझार
  सौजन्य- पैसा बाझार
  मॅच्युरिटीनंतर काय कराल? नियमांनुसार पीपीएफच्या मॅच्युरिटीचा काळ 15 वर्षांचा असतो. जर तुम्हाला 35 वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल तर 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हा काळ वाढवून घ्यावा लागेल. फॉर्म एच (Form H) भरून तुम्ही हा काळ 5-5 वर्षांसाठी वाढवून घेऊ शकता. यासाठी कोणतही मर्यादा नाही. तुम्ही कितीही वेळा हा कालावधी वाढवू शकता. संपादन - जान्हवी भाटकर
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Coronavirus, Open ppf account, PPF

  पुढील बातम्या