मराठी बातम्या /बातम्या /मनी /या 23 धोकादायक अ‍ॅप्समुळे होतेय युजर्सचे खाते रिकामे, मोबाइलमधून त्वरित करा डिलीट

या 23 धोकादायक अ‍ॅप्समुळे होतेय युजर्सचे खाते रिकामे, मोबाइलमधून त्वरित करा डिलीट

मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून युजर्सची फसवणूक केल्याची प्रकरणे गेले काही दिवस समोर येत आहेत. ज्यामुळे संशोधकांनी अँड्रॉइड (Android) युजर्ससाठी पुन्हा एकदा इशारा देऊन फोनमधील 23 अ‍ॅप्स हटवण्यास सांगितले आहे.

मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून युजर्सची फसवणूक केल्याची प्रकरणे गेले काही दिवस समोर येत आहेत. ज्यामुळे संशोधकांनी अँड्रॉइड (Android) युजर्ससाठी पुन्हा एकदा इशारा देऊन फोनमधील 23 अ‍ॅप्स हटवण्यास सांगितले आहे.

मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून युजर्सची फसवणूक केल्याची प्रकरणे गेले काही दिवस समोर येत आहेत. ज्यामुळे संशोधकांनी अँड्रॉइड (Android) युजर्ससाठी पुन्हा एकदा इशारा देऊन फोनमधील 23 अ‍ॅप्स हटवण्यास सांगितले आहे.

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून युजर्सची फसवणूक केल्याची प्रकरणे गेले काही दिवस समोर येत आहेत. ज्यामुळे अँड्रॉइड (Android) युजर्ससाठी पुन्हा एकदा इशारा देऊन फोनमधील 23 अ‍ॅप्स हटवण्यास सांगितले आहे. हे अ‍ॅप्स युजर्सच्या नकळत त्यांच्या खात्यातील पैसे लंपास करतात. जर तुम्ही देखील अँड्रॉइड युजर असाल तर काही अ‍ॅप्स डाऊनलोड करताना तुम्हाला देखील सजग राहणे गरजेचे आहे. सायबर सिक्युरिटी आणि सॉफ्टवेअर फर्म Sophos च्या संशोधकांनी या खतरनाक अ‍ॅप्सबाबत खुलासा केला आहे. अहवालाच्या मते हे सर्व फ्लेसवेअर (fleeceware) अ‍ॅप्स आहेत, ज्यांनी गूगल प्ले स्टोअरच्या पॉलिसीचे उल्लंघन केले आहे.

संशोधक जगदीश चंद्राइहा यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, गूगलवर मिळालेल्या या अ‍ॅप्सच्या अटी आणि त्यााचा फॉन्ट खूप छोटा आहेत ज्या वाचता येत नाहीत. यामध्ये काही कमतरता आहेत, ज्यामुळे अपायकारक कामांना परवानगी दिली जाते.

(हे वाचा-सोन्याच्या दरात घसरण सुरूच, विदेशी बाजारात उतरले सोने; भारतात असा होणार परिणाम)

दरम्यान Sophos च्या संशोधकांनी या 23 अ‍ॅप्सची यादी जाहीर केली आहे. हे अ‍ॅप्स डाऊनलोड करताना युजर्सनी अलर्ट राहणे गरजेचे आहे. या संशोधकांनी फोनमधून हे अ‍ॅप्स काढून टाकण्याचा सल्ला दिला आहेत. ते अ‍ॅप्स खालीलप्रमाणे-

com.photoconverter.fileconverter.jpegconverter

com.recoverydeleted.recoveryphoto.photobackup

com.screenrecorder.gamerecorder.screenrecording

com.photogridmixer.instagrid

com.compressvideo.videoextractor

com.smartsearch.imagessearch

com.emmcs.wallpapper

com.wallpaper.work.application

com.gametris.wallpaper.application

com.tell.shortvideocom.csxykk.fontmoji

com.dev.palmistryastrology

(हे वाचा-2000 च्या नोटेसंदर्भात मोठी बातमी! RBI बंद करणार ही नोट? वाचा सविस्तर)

com.video.magiciancom.el2020xstar.xstar

com.dev.furturescopecom.fortunemirror

com.itools.prankcallfreelitecom.isocial.fakechat

com.old.mecom.myreplica.celebritylikeme.pro

com.nineteen.pokeradar

com.pokemongo.ivgocalculatorcom.hy.gscanner

(हे वाचा-बँक खात्यातून फसवणुकीने पैसे काढण्यात आले आहेत? हे काम केल्यास मिळेल पूर्ण रक्कम)

चंद्राइहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लेसवेअर एकप्रकारचे मॅलवेअर मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आहे, जे छुप्या सब्सक्रिप्शन फीसह उपलब्ध होते. हे अ‍ॅप्लिकेशन त्या युजर्सचा फायदा घेते, ज्यांना हे माहित नसते की अ‍ॅप काढून टाकल्यावर सब्सक्रिप्शन रद्द कसे करावे. यामध्ये स्पॅम सब्सक्रिप्शनचा वापर केला जातो. युजरने एकदा चुकून साइन अप केले तर त्याला वेगवेगळ्या अ‍ॅप्सच्या समुहासाठी सब्सक्राइब करण्याचा पर्याय येतो. युजरकडून चुकून हे सब्सक्रिप्शन घेतले जाते.

ही चूक टाळण्यासाठी या संशोधकांनी अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.

First published:
top videos