Home /News /money /

2000 च्या नोटेसंदर्भात मोठी बातमी! RBI बंद करणार ही नोट? वाचा सविस्तर

2000 च्या नोटेसंदर्भात मोठी बातमी! RBI बंद करणार ही नोट? वाचा सविस्तर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India-RBI) त्यांच्या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की, वर्ष 2019-20 मध्ये 2000 च्या नोटा छापण्यात आल्या नाहीत (2000 Rupee Note Printing).

    नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India-RBI) त्यांच्या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की, वर्ष 2019-20 मध्ये 2000 च्या नोटा छापण्यात आल्या नाहीत (2000 Rupee Note Printing). गेल्या वर्षात 2000 च्या नोटा चलनात देखील खूप कमी प्रमाणात आहेत. मार्च 2018 च्या अखेरीस 2000 च्या नोटांचे 33,632 लाख पीस चलनात होते ते मार्च 2019 च्या अखेर पर्यंत कमी होऊन 32,910 लाख पीस वर आले आहेत. आरबीआयने त्यांच्या वार्षिक अहवालात असे म्हटले आहे की, मार्च 2020 अखेरीस 2000 च्या नोटांचे सर्क्युलेशन कमी होऊन 27, 398 लाख पीसवर आले आहे. 2000 रुपयांच्या नोटांसंदर्भात सरकारचे स्पष्टीकरण अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Minister of State for Finance & Corporate Affairs Anurag Thakur) यांनी अशी माहिती दिली आहे की, सध्या 2 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. अर्थव्यवस्थेमध्ये व्यापक सुधारणांची गरज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने असे म्हटले आहे की, कोव्हि़ड-19 च्या संकटकाळात भारताला विकासाच्या वाटेवर परतण्यासाठी सखोल आणि व्यापक सुधारणांची गरज आहे. कोरोनामुळे देशाचा संभाव्य विकास दर खाली येईल असा इशारा केंद्रीय बँकेने दिला आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या मूल्यांकन आणि संभाव्यतेमध्ये असे म्हटले आहे की कोरोनाच्या साथीने जागतिक अर्थव्यवस्थेला कठोरपणे मोडले आहे. भविष्यात जागतिक अर्थव्यवस्थेचा आकार यावर अवलंबून असेल की या साथीचा प्रसार कसा राहील, हा रोग किती काळ टिकेल आणि उपचारांसाठी आवश्यक असणारी लस किती काळात येते. केंद्रीय बँकेचे 'असेसमेंट्स अँड प्रॉस्पेक्ट्स 2019-20' या अहवालाचा भाग आहेत. (हे वाचा-जागतिक स्तरावर सोन्याचे दर पुन्हा उतरले, देशांतर्गत बाजारात 5000 रुपयांची घसरण ) आरबीआयने असे म्हटले आहे की, एक गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे कोरोनानंतर जग बदलेल आणि एक नवीन सामान्य उदयास येईल. रिझर्व्ह बँकेने असे म्हटले आहे की कोरोनानंतरच्या  परिस्थितीत सखोल आणि सर्वसमावेशक सुधारणांची आवश्यकता असेल. उत्पादनाच्या बाजारपेठेपासून आर्थिक बाजार, कायदेशीर चौकट आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा या सर्व आघाड्यांवर व्यापक सुधारणांची आवश्यकता असेल. तरच आपण विकास दरातील घसरणीवर मात करुन अर्थव्यवस्थेला आर्थिक स्थिरतेसह दृढ आणि टिकाऊ विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Rbi

    पुढील बातम्या