सोन्याच्या दरात घसरण सुरूच, विदेशी बाजारात पुन्हा उतरले सोने; भारतात असा होणार परिणाम

सोन्याच्या दरात घसरण सुरूच, विदेशी बाजारात पुन्हा उतरले सोने; भारतात असा होणार परिणाम

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव कमी होऊन 1920 डॉलर प्रति औंस झाले आहेत. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : अमेरिकेमध्ये अंदाजापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने सुरू झालेली नव्या घरांची विक्री (US New Home Sales) आणि रिचमंड मॅन्यूफॅक्चरिंग (Richmond Manufacturing Data) आकडेवारीनुसार सोन्याचांदीच्या दरात (Gold and Silver Rates Today) घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव कमी होऊन 1920 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, चांगल्या आर्थिक आकड्यांमुळे अमेरिकन डॉलरचे मुल्य वधारले आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन बाँड यील्डमध्ये वाढ, कोरोना व्हायरसच्या उपचारासंदर्भात वाढणाऱ्या आशा आणि अमेरिका-चीनमध्ये ट्रेड डीलची शक्यता या सर्वांमुळे सोन्याचांदीच्या दरावर दबाव वाढत आहे. याच संकेतांमुळे आज देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर कमी होऊ शकतात.

(हे वाचा-2000 च्या नोटेसंदर्भात मोठी बातमी! RBI बंद करणार ही नोट? वाचा सविस्तर)

या आठवड्यात 1500 रुपयांनी उतरले सोने-

सोमवारी किरकोळ घसरणीनंतर मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत 52,907 रुपये प्रति तोळावरून कमी होऊन 55,350 रुपये प्रति तोळा झाली आहे. या दरम्यान किंमतीमध्ये 557 रुपये प्रति तोळा घसरण झाली आहे. तर मुंबईमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर कमी होऊन 51628 रुपये प्रति तोळा झाले आहेत. या आठवड्यामध्ये साधारण 1500 रुपये प्रति किलोने सोन्याचे भाव कमी झाले आहेत.

(हे वाचा-बँक खात्यातून फसवणुकीने पैसे काढण्यात आले आहेत? हे काम केल्यास मिळेल पूर्ण रक्कम)

मंगळवारी चांदीचे भाव देखील कमी झाले होते. दिल्लीमध्ये एक किलो चांदीची किंमत 68,342 रुपयांवरून कमी होऊन 66,737 रुपये झाली आहे. या दरम्यान चांदीचे भाव 1,606 रुपयांनी कमी झाले आहेत. मुंबईमध्ये चांदीचे दर कमी होऊन 64,881 रुपये प्रति किलो आहेत.

आज काय होणार?

तज्ज्ञांच्या मते रुपयामध्ये आलेल्या मजबुतीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव आणखी कमी होऊ शकतात. बुलियन मार्केटच्या नजरा आता अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे चेअरमन जेरोम पॉवेल (Jerome Powell) यांच्या भाषणाकडे खिळल्या आहेत. या भाषणानंतर अमेरिकन डॉलरची परिस्थिती लक्षात येईल, ज्याचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर होतो.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 26, 2020, 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading