Home /News /money /

भारतामध्ये मोफतच असेल Google Pay, या देशामध्ये मनी ट्रान्सफर सेवेसाठी लागणार शुल्क

भारतामध्ये मोफतच असेल Google Pay, या देशामध्ये मनी ट्रान्सफर सेवेसाठी लागणार शुल्क

गुगलने (Google) बुधवारी असे जाहीर केले की, भारतात Google Pay ग्राहकांना पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आहे.

    नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर: पुढील वर्षापासून गुगल पे (Google Pay) वापरताना काही शुल्क द्यावे लागणार असे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. मात्र आता याबाबत भारतीयांना दिलासा मिळाला आहे.  गुगलने (Google) बुधवारी असे स्पष्ट केले आहे की, भारतात Google Pay ग्राहकांना पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आहे. हा शुल्काबाबतचा नियम अमेरिका स्थित गुगल पे ग्राहकांसाठी आहे. पुढील वर्षापासून बंद होणार वेब ब्राउजरच्या माध्यमातून गुगल पे च्या सेवा गेल्या आठवड्यात गुगलने अशी घोषणा केली होती की, पुढील वर्षी अँड्राइड (Android) आणि आयओएस (iOS) वर नवीन Google Pay App आणत आहे आणि त्यानंतर युजर्स वेब ब्राउजरच्या माध्यमातून सेवांचा वापर नाही करू शकणार. शिवाय अहवालानुसार गुगल पे इन्स्टंट मनी ट्रान्सफरवर देखील शुल्क आकारणार आहे. दरम्यान गुगलच्या एका प्रवक्त्याने माहिती दिली आहे की, 'विशेषत: हे शुल्क अमेरिकेसाठी आहे आणि भारतामध्ये गुगल पे किंवा गुगल पे फॉर बिझनेस (Google Pay for Business) अ‍ॅपवर हे शुल्क लागू होत नाही. (हे वाचा-DBS India मध्ये लक्ष्मी विलास बँकेच्या विलीनीकरणास कॅबिनेटची मंजुरी) काय आहे गुगल पे आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेज भारतामध्ये गुगल पे एक डिजिटल पेमेंट अ‍ॅप  (Digital Payment App) आहे जे UPI वर आधारित आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेज (Unified Payments Interface) किंवा युपीआय एक रिअल टाइम पेमेंट प्रणाली आहे. या प्रणालीअंतर्गत तुम्हाला मोबाइल प्लॅटफॉर्मचा वापर करून थेट बँकेच्या खात्यात पैसे पाठवण्याची सुविधा मिळते. युपीआयच्या माध्यमातून तुम्ही एक बँक खाते अनेक युपीआय अ‍ॅपशी लिंक करू शकता. त्याचप्रमाणे एक युपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून अनेक बँक खाती देखील संचालित करू शकता. (हे वाचा-PM मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीत 3 मोठे निर्णय, सामान्यांवर थेट परिणाम) ऑक्टोबर महिन्यात झाले 200 कोटींचे UPI ट्रान्झॅक्शन कोरोना काळात या डिजिटल पेमेंट प्रणालीचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. ऑक्टोबर 2020 च्या दरम्यान देशभरात युपीआय बेस्ड व्यवहारांबाबतीत बोलायचं झालं तर, देशात केवळ एका महिन्याच 200 कोटींचा आकडा पार झाला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Google

    पुढील बातम्या