DBS India मध्ये लक्ष्मी विलास बँकेच्या विलीनीकरणास कॅबिनेटची मंजुरी, पैसे काढण्याबाबतची मर्यादा हटवली

लक्ष्मी विलास बँकेच्या (Lakshmi Vilas Bank) खातेधारकांना जी 25 हजार रुपये काढण्याची मर्यादा होती, ती आता हटवण्यात आली आहे.

लक्ष्मी विलास बँकेच्या (Lakshmi Vilas Bank) खातेधारकांना जी 25 हजार रुपये काढण्याची मर्यादा होती, ती आता हटवण्यात आली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर: बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Union Cabinet) लक्ष्मी विलास बँक (Laksmi Vilas Bank) डीबीएस इंडियामध्ये (DBS India) विलीन करण्याच्या प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर लक्ष्मी विलास बँक सिंगापूरच्या सर्वात मोठ्या बँक डीबीएस बँकेच्या भारतीय शाखेत विलीन होईल. लक्ष्मी विलास बँक वाचविण्यासाठी आरबीआयने डीबीएस इंडियाबरोबर विलीनीकरणाचा मार्ग निवडला आहे. बुडण्यापासून वाचवण्यासाठी प्रथमच भारतीय बँकचे एखाद्या विदेशी बँकेत विलीनीकरण केले जात आहे. या निर्णयामुळे 20 लाख ठेवीदार आणि बँकेच्या 4000 कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) म्हणाले. याशिवाय बँकेच्या खात्यातून जास्तीत जास्त 25 हजार रुपये काढण्याची मर्यादाही दूर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आजची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावर्षातील लक्ष्मी विलास बँक ही दुसरी बँक आहे ज्या बँकेला आरबीआयने बु़डण्यापासून वाचवले आहे. याआधी RBI ने मार्चमध्ये YES बँकेला बुडण्यापासून वाचवले होते. अशी गेल्या 15 महिन्यातील LVB ही तिसरी बँक आहे. काय आहे या कराराचे वैशिष्ट्य? - DBS India मध्ये लक्ष्मी विलास बँकेचे विलीनीकरण झाल्यानंतर या करारानुसार डीबीएस इंडियाला LVB च्या 563 शाखा, 974 एटीएम आणि रिटेल बिझनेसमध्ये 1.6 अब्ज डॉलरची फ्रँचायझी मिळेल. (हे वाचा-PM मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठकीत 3 मोठे निर्णय, सामान्यांवर थेट परिणाम) -यानंतर 94 वर्ष जुन्या आणि खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या  लक्ष्मी विलास बँकेचे नाव संपूष्टात येईल आणि बँकेची इक्विटी देखील संपेल. या बँकेचे संपूर्ण डिपॉझिट DBS इंडियाकडे जाईल. -याआधी आरबीआयने लक्ष्मी विलास बँकेवर 16 डिसेंबरपर्यंत मोरेटोरियम (Moratorium) लागू केला होता. या दरम्यान खातेधार अधिकतर 25 हजारांची रक्कम काढू शकत होते. मात्र केंद्राने आजच्या बैठकीत विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यानंतर ही पैसे काढण्याची मर्यादा देखील हटवली आहे. त्यामुळे ग्राहकांना आवश्यकतेनुसार पैसे काढता येणार आहेत. (हे वाचा-Gold Price Today: मोठ्या घसरणीनंतर सोन्याला पुन्हा झळाळी, वाचा काय आहेत नवे दर) -ज्या लोकांचे वेतन खाते (Salary Account) लक्ष्मी विलास बँकेत किंवा इतर कोणत्याही प्रकारचे उत्पन्न या बँकेतील खात्यात येत होते होते त्यांना त्वरित थांबविण्यात आले आणि दुसर्‍या बँकेत हस्तांतरणाची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. यासाठी खातेदारांना एक पत्र लिहून त्यांचे वेतन किंवा अन्य उत्पन्न दुसर्‍या खात्यात वर्ग करण्याची विनंती करावी लागेल. लक्ष्मी विलास बँकेत तुमच्याकडे कर्ज खाते असल्यास ईएमआय रक्कम पहिल्या 25,000 रुपयांमधून वजा केली जाईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: