• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • शेतकऱ्यांसाठी Good News! या तारखेपर्यंत मिळणार PM Kisan चा 10वा हप्ता, खात्यात येणार 2000 रुपये

शेतकऱ्यांसाठी Good News! या तारखेपर्यंत मिळणार PM Kisan चा 10वा हप्ता, खात्यात येणार 2000 रुपये

तुम्ही जर पीएम शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचे लाभार्थी असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मीडिया अहवालांच्या मते पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता पाठवण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी (Good News for Farmers) मिळणार आहे. तुम्ही जर पीएम शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेचे लाभार्थी असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मीडिया अहवालांच्या मते पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता (When Farmers will get 10th installment of PM Kisan Samman Nidhi Yojana) पाठवण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा हप्ता ट्रान्सफर करण्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. आतापर्यंत केंद्राने भारतातील 11.37 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1.58 लाख कोटी रुपये हंस्तांतरित केले आहेत. केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याची योजना आखत आहे. सरकारने गेल्यावर्षी या कालावधीदरम्यानचा हप्ता 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला होता. हे वाचा-Pensioners ना आता No Tension! घरबसल्या जमा करता येईल वार्षिक जीवन प्रमाणपत्र 30 सप्टेंबरपूर्वी करा रजिस्ट्रेशन जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल आणि तरी देखील आधीचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर अजूनही तुम्ही नोंदणी करून हा हप्ता मिळवू शकता. जारी होणाऱ्या पुढील हप्त्यासह तुम्हाला आधीच्या हप्त्याची रक्कमही मिळेल, अर्थात तुमच्या खात्यात 4000 रुपये जमा होतील. मात्र तुम्हाला याकरता 30 सप्टेंबरपूर्वी योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला हे काम पूर्ण करावं लागेल. तुमचा अर्ज स्विकार झाल्यास तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात 2000 रुपये आणि डिसेंबर महिन्यात पुढील महिन्याचे 2000 रुपये असे 4000 रुपये मिळतील. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी मिळतात 6000 रुपये पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना (Farmers) बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गतदेशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात. हे वाचा-क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करायची आहे?, हे आहेत सर्वात टॉपचे Apps पात्र शेतकरी अशाप्रकारे करू शकतील नोंदणी -याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. -त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' (Farmers Corner) या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी करू शकता. -याठिकाणी 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका -कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल -तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील, शेतीविषयक तपशील विचारला जाईल -ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: