Home /News /money /

Facebook युजर्ससाठी खूशखबर! आता मिळेल फिक्स्ड कमाईची संधी, वाचा काय करावं लागेल?

Facebook युजर्ससाठी खूशखबर! आता मिळेल फिक्स्ड कमाईची संधी, वाचा काय करावं लागेल?

फेसबुक (Facebook) चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी बुधवारी फेसबुक युजर्सना एक खूशखबर दिली आहे. जाणून घ्या सविस्तर

    नवी दिल्ली, 15 जुलै: फेसबुक युजर्ससाठी (Facebook Users) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. फेसबुक (Facebook) चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी बुधवारी फेसबुक युजर्सना एक खूशखबर दिली आहे. झुकरबर्ग यांनी अशी माहिती दिली आहे कि, फेसबुक 2022 च्या अखेरपर्यंतर  क्रिएटर्सना (Facebook Creators) 1 बिलियन डॉलरचचे पेमेंट करण्यासाठी एका कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. फेसबुकवर युजर्सना आकर्षित करण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुक (Social Network) ने असं म्हटलं आहे कि सर्व क्रिकेटर्समध्ये या 1 बिलियन डॉलरचे वाटप केले जाईल. ज्यामुळे इन्फ्लूएन्सर्सना फेसबुकवर मुळ किंवा ओरिजिनल कंटेट तयार करण्यास प्रोत्साहन मिळेल. इन्फ्लूएन्सर्स फेसबुक आणि इन्स्टाग्रामची वैशिष्ट्ये वापरुन पैसे कमवण्यास सक्षम होतील. उदाहरणार्थ, निर्माते जर नियमितपणे लाइव्ह स्ट्रीम (Live Stream) करत असतील तर ते पैसे कमवू शकतात. हे वाचा-Gold Price Today: आज खरेदी करता येईल 7921 रुपयांनी स्वस्त सोनं,तपासा लेटेस्ट दर क्रिएटर्ससाठी खास योजना गेल्या एका वर्षात टेक कंपन्यांमध्ये एक मोठं वॉर सुरू आहे. हे प्रत्येक प्लॅटफॉर्म त्यांच्या युजर्सना खास करुन कंटेट क्रिएटर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये टिकटॉक आणि यूट्यूबसारख्या कंपन्यांचा देखील समावेश आहे. फेसबुकने असं म्हटलं आहे की, फेसबुकने वर्षअखेरपर्यंत इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर त्याचा बोनस ट्रॅक करण्यासाठी क्रिएटरसाठी एक खास प्लेस देण्याची योजना आखली आहे. हे वाचा-RBI ने रद्द केला राज्यातील या बँकेचा परवाना, ग्राहकांना काढता येणार नाहीत पैसे काय आहे फेसबुकची योजना? फेसबुकने त्यांचे प्रोडक्ट्स वापरण्याच्या बदल्यात क्रिएटर्सना पैसे देण्याची ही पहिली वेळ नाही. कंपनीने IGTV, YouTube सारखे मोठ्या फॉर्ममधील व्हिडीओ आणि रीलसारखी सुविधा देखील सुरू केली आहे, जी टिकटॉकप्रमाणे काम करते.  डिसेंबरमध्ये, फेसबुकने ब्लॅक गेमिंग समुदायात पुढील दोन वर्षांत 10 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. नोव्हेंबरमध्ये स्नॅपचॅटने स्पॉटलाइट फीचरवर पोस्ट करणाऱ्या कंटेट क्रिएटर्सना दररोज  $ 1 मिलियन देण्यास सुरुवात केली होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Facebook, Money, Tech news, Technology

    पुढील बातम्या