मुंबई, 05 ऑक्टोबर: सध्याच्या कठीण आर्थिक परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांना ऑक्टोबर 2021 मध्ये घरबसल्या (earn money from home) पैसे कमावण्याची उत्तम संधी मिळणार आहे. कारण या महिन्यात पॉलिसीबाजारसह (Policy Bazaar IPO) 12 कंपन्यांचे आयपीओ (IPO in October 2021) सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार आहेत. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत भारतीय कंपन्यांनी 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत इनिशिअल पब्लिक ऑफर अर्थात आयपीओच्या माध्यमातून 59,716 कोटी रुपये जमा केले आहेत. त्याचबरोबर अनेक कंपन्या अजूनही त्यांच्या आयपीओसाठी भांडवल बाजार नियामक असलेल्या 'सेबी'च्या (SEBI) मंजुरीची वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर 2021 मध्ये कोणकोणत्या कंपन्या इश्यू आणत आहेत, ते जाणून घेऊ या.
आयपीओद्वारे भांडवल गोळा करण्याच्या दृष्टीने ऑक्टोबर 2021 हा महत्त्वाचा महिना असेल. या महिन्यात 12 कंपन्या आयपीओच्या माध्यमातून 20,000 कोटी रुपयांहून अधिक निधी उभारण्याच्या दृष्टीने काम करत आहेत. शेअर बाजारातल्या तेजीचा टप्पा आणि लिक्विडिटीची कमतरता नसल्याने सध्या आयपीओसाठी योग्य वेळ आहे. सप्टेंबरमध्ये पाच कंपन्यांनी सुमारे 6,700 कोटी रुपये आयपीओद्वारे उभारले होते. यामध्ये अॅमी ऑरगॅनिक्स, विजया डायग्नोस्टिक्स, सन्सेरा इंजिनीअरिंग, पारस डिफेन्स आणि आदित्य बिर्ला सनलाइफ एमसी यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
Petrol Price Today:सर्वसामान्यांना फटका,सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ
2021-22 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सहा महिन्यांचा विचार केल्यास या काळात मोठ्या संख्येने आयपीओ येणार आहेत. कंपन्या याद्वारे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारू शकतात. कॅपिटलव्हिला ग्लोबल रिसर्चच्या (CapitalVila Global Research) संशोधन विभागाचे प्रमुख गौरव गर्ग म्हणाले, की 'आयपीओच्या दृष्टीने चालू वर्ष आतापर्यंत खूप चांगलं आहे. आयपीओची उर्वरित वर्षांची कामगिरी दुय्यम बाजाराच्या कामगिरीवरदेखील अवलंबून असेल. फेडरल रिझर्व्हने बाँड खरेदीमध्ये कपात केल्यामुळे बाजाराला फटका बसू शकतो; मात्र इकॉनॉमिक रिकव्हरीमध्ये तेजी आणि त्याचे होणारे परिणाम हे घटक आयपीओसाठी उत्तम वातावरण तयार करू शकतात.'
घर घेण्यासाठी Home Loan घेताय? करसवलत मिळण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
ऑक्टोबरमध्ये या कंपन्यांचे येणार आयपीओ
ऑक्टोबर 2021 मध्ये पॉलिसीबाजारचा 6,017 कोटी रुपयांचा, नायकाचा 4,000 कोटी रुपये, नॉर्दर्न आर्क कॅपिटलचा 1,800 कोटी रुपये, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेचा 1,330 कोटी रुपये, एमक्योर फार्मास्युटिकल्सचा 4,500 कोटी रुपये आणि मोबिक्विकचा 1,900 कोटी रुपयांचा आयपीओ येणार आहे. याशिवाय, ऑक्टोबरमध्ये स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचीसुद्धा पब्लिक ऑफर येणार आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 26 कंपन्यांना पब्लिक ऑफर प्राप्त झाल्या आहेत आणि त्या माध्यमातून 59,716 कोटी रुपये जमा झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Savings and investments