मराठी बातम्या /बातम्या /मनी /PNB ग्राहकांसाठी खूशखबर! 1 जूनपासून बँकेत झाला मोठा बदल, कसा होणार फायदा?

PNB ग्राहकांसाठी खूशखबर! 1 जूनपासून बँकेत झाला मोठा बदल, कसा होणार फायदा?

बँकेने MCLR रेट्समध्ये कपात केली आहे. आता तुम्हाला तुलनेने कमी दरात कर्ज उपलब्ध होईल. बँकेने सोमवारी याबाबत शेअर मार्केटला माहिती दिली होती.

बँकेने MCLR रेट्समध्ये कपात केली आहे. आता तुम्हाला तुलनेने कमी दरात कर्ज उपलब्ध होईल. बँकेने सोमवारी याबाबत शेअर मार्केटला माहिती दिली होती.

बँकेने MCLR रेट्समध्ये कपात केली आहे. आता तुम्हाला तुलनेने कमी दरात कर्ज उपलब्ध होईल. बँकेने सोमवारी याबाबत शेअर मार्केटला माहिती दिली होती.

नवी दिल्ली, 01 जून: सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेने  (Punjab National Bank) कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने एमसीएलआर (MCLR) मध्ये कपात केली आहे. आता तुम्हाला तुलनेने कमी दरात कर्ज उपलब्ध होईल. बँकेने सोमवारी याबाबत शेअर मार्केटला माहिती दिली होती. पीएनबीने एका वर्षाच्या एमसीएलआरमध्ये 0.05 टक्क्यांची कपात करत दर 7.30 टक्के केले आहेत. हे नवे दर आज अर्थात 1 जूनपासून लागू होणार आहेत.

याशिवाय सहा महिने आणि तीन महिने कालावधी असणाऱ्या एमसीएलआरमध्ये देखील 0.10 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. यानंतर व्याजदर अनुक्रमे 7 टक्के आणि 6.80 टक्के झाले आहेत. ओव्हरनाइट, एक महिना आणि तीन वर्षाच्या एमसीएलआरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

PNB मधील सुधारित MCLR (1 जून 2021 पासून होणार लागू)

ओव्हरनाइट- 6.65%

एक महिना- 6.70%

हे वाचा-सोन्याचांदीच्या दरात मोठी उसळी, सोनं 50 हजारांच्या जवळपास तर चांदी 72 हजारांवर

तीन महिने- 6.80%

सहा महिने- 7.00%

एक वर्ष- 7.30%

तीन वर्ष- 7.60%

MCLR म्हणजे काय?

मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स अर्थात एमसीएलआर ही आरबीआय द्वारे निश्चित करण्यात आलेली एक पद्धती आहे ज्याआधी कमर्शिअल बँका कर्जावरील व्याज दर निश्चित करतात. जेव्हा तुम्ही एखाद्या बँकेतून कर्ज घेता तेव्हा बँकेकडून घेण्यात येणाऱ्या व्याजाच्या कमीतकमी दराला आधार दर म्हटलं जातं. आधार दरापेक्षा कमी दरावर बँक कर्ज देऊ शकत नाही. याच आधार दराच्या जागी बँका आता MCLR चा वापर करतात. 2016 पासून याचा वापर सुरू करण्यात आला होता.

हे वाचा-LPG Price Today: मोठा दिलासा! गॅस सिलेंडरच्या किंमती उतरल्या, इथे तपासा नवे दर

कोणतीही बँक एमसीएलआरवर कर्ज देते. पण बँक यापेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नाही. एमसीएलआर बरोबर किंवा त्यापेक्षा जास्त गृहकर्जाचे किंवा वाहन कर्जाचे व्याज दर असतात. अशाप्रकारे लेंडिंग रेटमध्ये कपात झाल्यामुळे MCLR संबंधित गृह आणि इतर कर्जांचा ईएमआय देखील कमी होईल.

First published:

Tags: Pnb, Pnb bank