मुंबई, 23 मे: तुम्हाला देखील घरबसल्या तुमच्या EPF खात्यामध्ये किती शिल्लक जमा झाली आहे हे तपासायचं असेल तर याबाबतची माहिती EPFO ने ट्वीट केली आहे. काही सोपे मार्ग अवलंबून तुम्ही तुमच्या खात्यामध्ये किती बॅलन्स आहे हे तपासू शकता. यामध्ये तुम्ही मिस्ड कॉल (Missed Call)देऊन देखील तुमच्या खात्यातील रक्कम तपासू शकता. याकरता EPFO ने क्रमांक देखील जारी केला आहे. याशिवाय तुम्ही SMS च्या माध्यमातून, वेबसाइटचा वापर करून किंवा UMANG App वापरुन खात्यात किती रक्कम आहे हे तपासू शकता
1. Missed Call देण्यासाठी डायल करा हा क्रमांक
यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकता
How to check EPF Balance at home?
घर बैठे ईपीएफ बैलेंस कैसे देखें?#EPFO #SocialSecurity #HumHainNa pic.twitter.com/ejZKpdHxXw — EPFO (@socialepfo) May 22, 2021
2. SMS च्या माध्यमातून जाणून घ्या पीएफ बॅलन्स
SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे.
हे वाचा-Gold Price: सर्वोच्च दरावरून 7600 रुपयांनी स्वस्त झालं सोनं, मे महिन्यात तेजी
3. UMANG APP
या App च्या माध्यमातून तुमच्या ईपीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवरून वन टाइम रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर तुम्ही 'उमंग'मध्ये तुमचे ईपीएफ पासबुक पाहू शकता. त्याचप्रमाणे क्लेम देखील करू शकता आणि केलेला क्लेम ट्रॅक देखील करू शकता.
हे वाचा-सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी! मोदी सरकारकडून खरेदी करा स्वस्त सोनं
4. वेबसाइटच्या माध्यमातून तपासा पीएफमधील शिल्लक
याकरता तुम्हाला Epfindia.gov.in वर लॉग इन करावे लागेल. याठिकाणी तुमचा UAN क्रमांक, पासवर्ज आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करून ई-पासबुकवर क्लिक करा. याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा आणि अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.