जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold-Silver Prices Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा तेजी, सोनंखरेदीआधी तपासा लेटेस्ट भाव

Gold-Silver Prices Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा तेजी, सोनंखरेदीआधी तपासा लेटेस्ट भाव

Gold-Silver Prices Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा तेजी, सोनंखरेदीआधी तपासा लेटेस्ट भाव

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी आज सोन्याच्या दरात (Gold Rate on 14th January 2022) उसळी पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरात (Silver Rate on 14th January 2022) किरकोळ तेजी आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जानेवारी: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी आज सोन्याच्या दरात (Gold Rate on 14th January 2022) उसळी पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरात (Silver Rate on 14th January 2022) किरकोळ तेजी आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर आज सोन्याच्या दरात 0.26 टक्क्यांची तेजी आली आहे, तर चांदीचे दर 0.07 टक्क्यांनी किरकोळ वाढले आहेत. जाणून घ्या आज किती आहे सोन्या-चांदीचे दर आज फेब्रुवारीतील डिलिव्हरीसाठी MCX सोन्याच्या किमती 0.26 टक्क्यांनी वाढून 47,860 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. दुसरीकडे, आजच्या व्यवहारात चांदी 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 61,962 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर

शहरआजचा दर (प्रति तोळा)कालचा दर (प्रति तोळा)
मुंबई49110 रुपये49100 रुपये
पुणे48850 रुपये48840 रुपये
नाशिक48850 रुपये48840 रुपये
नागपूर49110 रुपये49100 रुपये

हे वाचा- IOCL ने जारी केले पेट्रोल-डिझेलचे नवे दर, तुमच्या शहरात काय आहे किंमत मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. हे वाचा- पतीच्या मृत्यूचा धक्का अन् 7000 कोटींचं कर्ज; मालविकांनी CCD ला आणले अच्छे दिन! कशी तपासाल सोन्याची शुद्धता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात