Home /News /money /

Gold Gift Tax: गिफ्ट मिळालेल्या सोन्यावरही द्यावा लागतो टॅक्स, वाचा काय आहे नियम?

Gold Gift Tax: गिफ्ट मिळालेल्या सोन्यावरही द्यावा लागतो टॅक्स, वाचा काय आहे नियम?

भारतात गिफ्ट आयटम्सवर टॅक्स (Tax on Gift) आकारला जात नाही, मात्र सोनं या कक्षेत येत नाही. भेट देण्यात आलेलं सोनं टॅक्स फ्री नाही आहे. एका निश्चित मर्यादेनंतर गिफ्ट देण्यात आलेल्या सोन्यावरही कर आकारला जातो.

    मुंबई, 11 जानेवारी: भारतामध्ये सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक (Investment in Gold) सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. गुंतवणूक किंवा सौंदर्यात भर घालण्याच्या दृष्टीने सोनेखरेदी केली जाते. गेल्या काही काळात सोन्याच्या वाढत्या किंमती पाहता त्यातून मोठा फायदा होऊ शकतो, याच हिशोबाने सोन्याकडे पाहिले जाते. सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे, या दरम्यान सोन्याचे दागिने, नाणी इ. गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींना गिफ्ट दिल्या जातात. वाढदिवस किंवा अन्य काही कारणानिमित्तही सोनं भेट म्हणून दिलं जातं. सोन्याच्या दागिन्यांसाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. भारतीयांचे सोन्याप्रति असणारे प्रेम पाहता, मोठ्या प्रमाणात सोने आयात देखील केले जाते. सोन्याचे दर जरी वाढले असले तरी भारतात या मौल्यवान धातूची खरेदी थांबली नाही आहे. भारतात गिफ्ट आयटम्सवर टॅक्स (Tax on Gift) आकारला जात नाही, मात्र सोनं या कक्षेत येत नाही. भेट देण्यात आलेलं सोनं टॅक्स (Tax on Gold) फ्री नाही आहे. एका निश्चित मर्यादेनंतर गिफ्ट देण्यात आलेल्या सोन्यावरही कर आकारला जातो. डिजिटल गोल्ड, फिजिकल गोल्ड, पेपर गोल्ड, डेरिव्हेटिव्ह काँट्रॅक्टसारख्या विविध मार्गांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक आणि त्यावर झालेल्या कमाईवरही टॅक्स द्यावा लागतो. हे वाचा-आधी होतं एक दुकान आता 400 कोटींची होते उलाढाल; वाचा Ferns N Petals ची यशोगाथा सोन्यातील गुंतवणुकीवर टॅक्स (Tax on Gold Investment) फिजिकल गोल्ड जसे की दागिने, नाणी, बिस्किटं किंवा गोल्ड बार इ. मध्ये तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर त्यावर टॅक्सचे नियम वेगवेगळे आहेत. सोनेखरेदी करताना तुम्हाला जीएसटी भरावा लागतो. जर एखादी व्यक्ती सोन्याची विक्री करत असेल तर त्याला 20 टक्क्याच्या हिशोबाने टॅक्स द्यावा लागतो. सोन्याच्या विक्रीवर लाँग टर्म कॅपिटल गेन्स (LTCG) नुसार 4% चा सेस वेगळा द्यावा लागतो. सोनेखरेदी केल्यानंतर जर ते 36 महिन्याच्या आतमध्ये विकले तर ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स (STCG) अंतर्गत येते. 36 महिन्यानंतर सोन्याची विक्री झाल्यास ते LTCG अंतर्गत येते. केव्हा द्यावा लागणार नाही कर? लग्न समारंभात आईकडून मुलीला काही प्रमाणात सोनं गिफ्ट म्हणून दिलं जातं. अनेकदा ही मुलगी ते सोनं तिच्या मुलीला लग्नात भेट म्हणून देते. ही परंपरा अनेक वर्ष चालत राहते. अशाप्रकारच्या भेटीवर टॅक्स आकारला जात नाही. हे सोने वारशाने मिळते. अशाप्रकारे तुम्हाला कुटुंबाकडून वारसा हक्काने सोने मिळाले असेल तर त्यावर टॅक्स आकारला जात नाही. हे वाचा-कर्मचाऱ्यांच्या संपामुळे फेब्रुवारीत 'या' दोन दिवशी बँकांचं कामकाज होणार ठप्प! केव्हा द्यावा लागेल टॅक्स? जर तुम्हाला एखाद्या दुरच्या नातेवाईकाकडून सोनं गिफ्ट मिळालं आहे तर त्या भेटीवर टॅक्स द्यावा लागतो. हा टॅक्स 'इन्कम फ्रॉम अदर सोअर्स' या सदराअंतर्गत येतो. या सोन्यावर टॅक्स तेव्हाच आकारला जातो जेव्हा या गिफ्ट मिळालेल्या सोन्याची किंमत 50,000 रुपयांपेक्षा अधिक असते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या