Home /News /money /

Petrol Price Today: IOCL ने जारी केले पेट्रोल-डिझेलचे नवे दर, तुमच्या शहरात काय आहे किंमत

Petrol Price Today: IOCL ने जारी केले पेट्रोल-डिझेलचे नवे दर, तुमच्या शहरात काय आहे किंमत

आज शुक्रवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price Today 14th January 2022) दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOCL) ने पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत.

    मुंबई, 14 जानेवारी: आज शुक्रवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price Today 14th January 2022) दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल (IOCL) ने पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत. नवीन दरानुसार मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 86.67 रुपये प्रति लीटरवर स्थिर आहेत. कशाप्रकारे तपासाल इंधनाचे दर? पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (How to check diesel petrol price daily) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. इंडियन ऑइलचे कस्टमर 92249 92249 वर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात. हे वाचा-आई-वडिलांसाठी खंबीरपणे उभी राहिली मैथिली; लेकीची माया पाहून हृदय पिळवटून निघेल राज्यातील इंधनाचा भाव मुंबईत पेट्रोल-डिझेलचा भाव स्थिर असून गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरातही पेट्रोल-डिझेलचे दर किरकोळ बदलले आहेत. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 109.89 रुपये प्रति लीटरवर आहेत, तर डिझेल 92.66 रुपये प्रति लीटरवर आहे. महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये मिळते आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील इतर शहरात इंधनाचा दर काय आहे.
    शहर पेट्रोलचा भाव (प्रति लीटर) डिझेलचा भाव (प्रति लीटर)
    पुणे 109.89 रुपये 92.66 रुपये
    मुंबई 109.98 रुपये 94.14 रुपये
    नाशिक 109.49 रुपये 92.29 रुपये
    नागपूर 109.71 रुपये 92.53 रुपये
    अहमदनगर 110.15 रुपये 92.92 रुपये
    औरंगाबाद 110.38 रुपये 93.14 रुपये
    रत्नागिरी 110.97 रुपये 93.68 रुपये
    रायगड 109.79 रुपये 92.54 रुपये
    परभणी 112.49 रुपये 95.17 रुपये
    पालघर 109.66 रुपये 92.42 रुपये
    सांगली 109.65 रुपये 92.47 रुपये
    कोल्हापूर 110.09 रुपये 92.89 रुपये
    सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol price, Petrol price hike

    पुढील बातम्या