• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • सोन्याच्या किंमतीने गाठला उच्चांक, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे भाव

सोन्याच्या किंमतीने गाठला उच्चांक, चांदीही वधारली; जाणून घ्या आजचे भाव

वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीने सोमवारी उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत वायदे बाजारावर त्याचा परिणाम पाहायला मिळाला.

 • Share this:
  नवी दिल्ली, 13 एप्रिल : वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीने सोमवारी उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत वायदे बाजारावर त्याचा परिणाम पाहायला मिळाला. एमसीएक्स एक्सचेंजमध्ये सोमवारी सकाळच्या सत्रात सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 5 जून 2020 साठी सोन्याच्या वायदा भाव 0.95 टक्क्यांनी म्हणजेच 431 रुपयांनी वाढला. परिणामी सोन्याची वायदे बाजारातील किंमत प्रति तोळा 45,725 रुपये इतकी होती. त्यानंतर सोन्याचा वायदा भाव  45,800 रुपये  प्रति तोळावर गेला आहे. हा वायदे बाजारातील उच्चांक आहे. (हे वाचा-अलर्ट!EMI स्थगित करण्यासाठी फसवणूक; SBI,अ‍ॅक्सिससह सर्व बँकांचा ग्राहकांना इशारा) 5 ऑगस्टसाठी सोन्याचा वायदे भाव देखील वधारला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सोन्याच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. देशांतर्गत गोल्ड स्पॉट मार्केट देखील बंद आहेत. त्याचप्रमाणे वायदे बाजारात सोन्याची किंमती  तेजीनी वाढताना पाहायला मिळत आहेत. 5 ऑगस्टसाठीचा वायदे भाव 0.99 टक्के म्हणजेच 451 रुपयांनी वाढून प्रति तोळा 45,937 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या वायदा किंमतीतही सोमवारी काहीशी वाढ पाहायला मिळाली. 5 मेच्या चांदीच्या वायदा किंमतीत 286 रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी प्रति किलो चांदीची किंमत 43,788 रुपयांवर पोहोचली आहे. (हे वाचा-कोरोनाच्या लढाईसाठी भारताला 16,500 कोटी देण्याचे या बँकेचे आश्वासन) सोन्याचांदीचे भाव वायदे बाजारात वाढले असले तरी आज कच्च्या तेलाच्या वायदा किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. एमसीएक्सवर सोमवारी 18 मेच्या कच्च्या तेलाच्या वायदा किंमतीमध्ये 94 रुपयांची घसरण झाली आहे. परिणामी कच्च्या तेलाची वायदा किंमत 2316 रुपये प्रति बॅरलवर ट्रेंड करत आहे. (हे वाचा-COVID-19: कच्च्या तेलाचे भाव उतरले,सरकार जमिनीखाली गुहांमध्ये करणार लाखो टन साठा) देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे देशातील सोन्याच्या बाजारपेठा बंद आहेत. सध्या लग्नसमारंभ किंवा इतर सोहळे रद्द झाल्यामुळे सोन्याची मागणी देखील कमी झाली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा मोठा परिणाम सोने व्यापारावर होत आहे. संपादन- जान्हवी भाटकर
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: