अलर्ट! EMI स्थगित करण्यासाठी होतेय फसवणूक; SBI,अ‍ॅक्सिस, ICICIसह सर्व बँकांचा ग्राहकांना इशारा

कोरोनाच्या (Coronavirus) गंभीर परिस्थितीतही काही भामटे सामान्यांना लुबाडत असल्याची बाब समोर येत आहे. परिणामी बँकांनी त्यांच्या ग्राहकांना सतर्क राहण्यासाठी अलर्ट पाठवला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 एप्रिल : कोरोनाच्या (Coronavirus) गंभीर परिस्थितीतही काही भामटे सामान्यांना लुबाडत असल्याची बाब समोर येत आहे. परिणामी बँकांनी त्यांच्या ग्राहकांना सतर्क राहण्यासाठी अलर्ट पाठवला आहे. कोरोनामुळे देशातील नागरिकांचं अगणित आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत आरबीआय (Reserve Bank of India RBI)कडून सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना राबण्यात येत आहेत. आरबीआयने EMI वर 3 महिन्यांची सवलत दिली आहे. म्हणजेच तुमच्या मुदत कर्जाचा हफ्ता 3 महिन्यांनी भरणं शक्य आहे. 3 महिन्यांसाठी ईएमआय स्थगित करण्यासाठी त्या त्या बँकेकडून तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर त्या आशयाचा मेसेज पाठवण्यात येत आहे. मात्र काहीजण या परिस्थितीचा फायदा घेत लोकांना लुबाडत असल्याची बाब समोर येत आहे.

(हे वाचा-15 एप्रिलपासून रेल्वेसेवा सुरू होणार? जाणून घ्या रेल्वेचा पोस्ट लॉकडाऊन प्लॅन)

काही फसवणूक करणारे व्यक्ती ग्राहकांना त्यांचे ईएमआय स्थगित करण्यासाठी ओटीपी किंवा पिन मागण्यासाठी कॉल करत आहेत. त्यानंतर ग्राहकांच्या खात्यातील पैसे लाटण्याचे बेकायदेशीर काम सुरू आहे. त्यामुळे अशी संवेदनशील मागणी ग्राहकांनी या भामट्यांना देऊ नये याकरता अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय (ICICI) तसंच जवळपास सर्व बँकांनी याबाबत ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. ईएमआय सवलतीचा फायदा घेत ग्राहकांना लुबाडण्याचं काम सुरू आहे अशी माहिती या अलर्टमध्ये देण्यात आली आहे.

अ‍ॅक्सिस बँकने मेल करून दिली सूचना

अ‍ॅक्सिस बँकेने मेल करून सुरू असलेल्या फसवणुकीबाबत माहिती दिली आहे. बँकेने ग्राहकांना कळवले आहे की, हे फसवणूक करणारे इसम ईएमआयमध्ये सवलत मिळवून देतो सांगत ओटीपी, सीव्हीव्ही किंवा पिन मागत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा. तुम्ही माहिती दिलीत तर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. अ‍ॅक्सिस बँकेप्रमाणेच इतर बँकांनीही मेसेज, मेल किंवा अ‍ॅपद्वारे नोटिफिकेशन पाठवून यासंदर्भात माहिती दिली आहे.अ‍ॅक्सिस बँकेने यासंदर्भात ट्वीट देखील केले आहे.

एसबीआयची ट्वीटरवरून माहिती

एसबीआयने ट्वीट करत ग्राहकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पीआयबी फॅक्ट चेख (PIB Fact Check) आणि एसबीआयने याबाबत ग्राहकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. PIB Fact Check ने एसबीआयचं ट्वीट रीट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

बँकांंनी याबाबत माहिती तर दिली आहेच तर पोलीस सुद्धा याबाबत वेळोवेळी खबरदार राहण्याचा इशारा देत आहेत. आरबीआयने दिलेल्या या सवलतीमध्ये सर्व वाणिज्य बँका- Commercial Banks (प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँक आणि स्थानिक क्षेत्रातील बँकांसह), सहकारी बँका, अखिल भारतीय वित्तीय संस्था आणि एनबीएफसी (गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि मायक्रो-फायनान्स संस्थांसह) समाविष्ट आहेत. आरबीआयने सर्व टर्म लोनवर 3 महिन्यांचा मोरोटोरियम लागू केला आहे.

(हे वाचा- कोरोनाच्या लढाईसाठी भारताला 16,500 कोटी देण्याचे या बँकेचे आश्वासन)

यामुळे बँकानी त्यांच्या ग्राहकांना 3 महिन्याचा ईएमआय न भरण्याची मुभा दिली आहे आणि यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोर देखील खराब होणार नाही. मात्र जर अशा पद्धतीने कुणी लुबाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर सावध आणि जागरूक राहणे आवश्यक आहे.

संपादन- जान्हवी भाटकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2020 05:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading