Home /News /money /

कोरोनाच्या लढाईसाठी भारताला 16,500 कोटी देण्याचे या बँकेचे आश्वासन

कोरोनाच्या लढाईसाठी भारताला 16,500 कोटी देण्याचे या बँकेचे आश्वासन

आशियायी विकास बँकचे (एडीबी) अध्यक्ष मासत्सुगू असकावा यांनी कोरोनाविरोधात लढण्यासाठी भारताची मदत करण्यासाठी 2.2 अब्ज अमेरिकन डॉलरची (जवळपास 16,500 कोटी रुपये) मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे.

    नवी दिल्ली, 10 एप्रिल : आशियायी विकास बँकचे (एडीबी) अध्यक्ष मासत्सुगू असकावा यांनी शुक्रवारी कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी भारताची मदत करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना 2.2 अब्ज अमेरिकन डॉलरची (जवळपास 16,500 कोटी रुपये)  मदत देण्याचं  आश्वासन दिलं आहे. असकावा यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारच्या उपाययोजनांचं कौतुक केलं आहे. यामध्ये नॅशनल हेल्थ इमरजन्सी प्रोग्रॅम, उद्योगांसाठी कर आणि अन्य सुविधा त्याचप्रमाणे 26 मार्चला घोषित करण्यात आलेल्या 1.7 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज या योजनांचा समावेश आहे. (हे वाचा-COVID-19: कच्च्या तेलाचे भाव उतरले,सरकार जमिनीखाली गुहांमध्ये करणार लाखो टन साठा) सरकारने या तीन आठवड्यांच्या लॉकडाऊन काळामध्ये ज्या  वर्गाला याचा आर्थिक फटका बसू शकतो अशा, गरीब, महिला आणि मजूरांसाठी तात्काळ पैसे त्याचप्रमाणे रेशन देण्याचा समावेश या आर्थिक पॅकेजमध्ये होत आहे. (हे वाचा-15 एप्रिलपासून रेल्वेसेवा सुरू होणार? जाणून घ्या रेल्वेचा पोस्ट लॉकडाऊन प्लॅन) असकावा यांनी सांगितलं की एडीबी भारताच्या आपात्कालीन गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही आरोग्य क्षेत्र, गरीब आणि मजूर, छोटे तसंच मध्यम स्तरावरील व्यापारी आणि आर्थिक क्षेत्रावर कोरोनामुळे झालेला परिणामाची तीव्रता कमी करण्यासाठी 2.2 अब्ज अमेरिकन डॉलरची मदत तात्काळ करायला तयार आहोत. एडीबीने दिलेल्या माहितीनुसार ते सध्या खाजगी क्षेत्रातील आर्थिक मागण्या पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. (हे वाचा-पोस्टाच्या या योजनेचा प्रीमियम भरण्याची मुदत वाढवली,13 लाख पॉलिसीधारकांना दिलासा) गरज पडल्यास भारतासाठी एडीबीचे साहाय्य वाढवण्यात येईल असही त्यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही भारताच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व आर्थिक पर्यायांचा विचार करू. यामध्ये आपात्कालीन मदत, नीती आधारित कर्ज आणि अर्थसंकल्पीय समर्थन याचा समावेश आहे. संंपादन- जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या