मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: आज सोन्याचा भाव वधारला की कमी झाला? जाणून घ्या लेटेस्ट गोल्ड रेट्स

Gold Price Today: आज सोन्याचा भाव वधारला की कमी झाला? जाणून घ्या लेटेस्ट गोल्ड रेट्स

गेल्या काही दिवासांपासून सोन्याचांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र असे असले तरीही रेकॉर्ड हायपेक्षा मोठ्या फरकाने सोन्याचे दर कमी आहेत. त्यामुळे तुमच्याकडे सोनेखरेदीची संधी आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: गेल्या काही दिवासांपासून सोन्याचांदीच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र असे असले तरीही रेकॉर्ड हायपेक्षा मोठ्या फरकाने सोन्याचे दर कमी आहेत. त्यामुळे तुमच्याकडे सोनेखरेदीची संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Gold Price on Multi Commodity Exchange) डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचा दर 0.09 टक्के दराने वाढला आहे. तर चांदीच्या दरात 0.19 टक्क्यांची वाढ झाली आहे.

रेकॉर्ड स्तरापेक्षा 8232 रुपयांनी स्वस्त झालेत सोन्याचे दर

सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यानंतरही आज सोन्याचे दर विक्रमी उच्चांकापेक्षा खूपच स्वस्त आहेत. 2020 सालाबद्दल बोलायचे झाले तर ऑगस्ट महिन्यापर्यंत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. आज डिसेंबर फ्युचर गोल्डची एमसीएक्सवर किंमत 47,968 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच अजूनही सोन्याचा दर 8232 रुपयांनी कमी आहे.

हे वाचा-1 डिसेंबरपासून PNB करणार मोठा बदल, ग्राहकांच्या खिशावर होणार थेट परिणाम

सोन्याचांदीचा आजचा भाव

डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत 0.09 टक्क्यांनी वाढून आज 47,968 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या ट्रेडमध्ये चांदी 0.19 टक्क्यांनी वाढली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 64,964 रुपये आहे.

कशाप्रकारे जाणून घ्याल सोन्याचा भाव?

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

हे वाचा-स्वस्तात मिळत आहेत झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्स, बंपर रिटर्नची अपेक्ष

अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today