किती असणार व्याज- बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, बचत खात्यावर (PNB Saving Account Interest Rate Update) मिळणारे वार्षिक व्याज 2.90 टक्क्यांवरुन 2.80 टक्के करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या या निर्णयामुळे जुन्या आणि नवीन दोन्ही ग्राहकांवर परिणाम होणार आहे. शिवाय एनआरआय ग्राहकांवर देखील याचा परिणाम होणार आहे. याआधी पंजाब नॅशनल बँकेने 1 सप्टेंबर रोजी बचत खात्यावरील व्याजदरात कपात करत ते 2.90 टक्के केले होते.
PNB देशातील दुसरी मोठी सरकारी बँक आहे. याआधी स्टेट बँक ऑफ इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया बचत खात्यावर 2.70 टक्के दराने वार्षिक व्याजदर देऊ करते. एसबीआय एक लाख रुपयांपर्यंतचा डिपॉझिटवर 2.70 टक्के दराने व्याज देते. तर Kotak Mahindra Bank आणि इंडसइंड बँकेच्या बचक खात्यावर वार्षिक 4-6% व्याजदर आहे.