मुंबई, 19 नोव्हेंबर : पेटीएमची मूळ कंपनी One97 Communications चे शेअर्स गुरुवारी लिस्टिंगनंतरही घसरत राहिले. पेटीएमचे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर त्याच्या IPO किमतीच्या जवळपास 9 टक्क्यांहून खाली लिस्टिंग झाले आणि नंतर सुमारे 27 टक्के घसरून 1,564 रुपयांवर बंद झाले. Paytm च्या IPO ला 1.9x सबस्क्रिप्शन मिळाले, जे अनेक विश्लेषकांनी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे सांगितले. Paytm चा IPO हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा IPO आहे. जरी त्याची लिस्टिंग या वर्षातील सर्वात वाईट लिस्टिंगपैकी एक आहे. CNBC-TV18 शी बोलताना, कंपनीचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा म्हणाले की, शेअरची किंमत कंपनीच्या व्यवसाय मॉडेलचे योग्य पद्धतीने दिसत नाही आणि लोकांना ते समजण्यास थोडा वेळ लागेल. फायनान्स आणि टेक्नॉलॉजी कंपनीचे एकत्रित मॉडेल सध्या खूप नवीन आहे, असंही ते म्हणाले. Macquarie Capital Securities चे सुरेश गणपथी म्हणाले की, पेमेंट बँक म्हणून ते कर्ज देऊ शकत नाहीत. पण जर त्यांना स्मॉल फायनान्स बँकेचा परवाना मिळाला तर ते नक्कीच करू शकतात. आम्हाला विश्वास आहे की ते स्मॉल फायनान्स बँकांसोबत असे करू शकतात. फायनान्स बँकेचा परवाना मिळणे हे शक्य आहे. अर्थातच हे सर्व RBI त्यांना कोणत्या दृष्टिकोनातून पाहते यावर अवलंबून आहे. कमी पगारामुळे लग्नासाठी मुलींनी दिला होता नकार; आता आहे अब्जाधीश White Oak Capital Management चे इन्व्हेस्टमेंट डायरेक्टर रमेश मंत्री म्हणाले की, UPI वर आधारित PhonePe आणि GooglePay सारखे अनेक नवीन खेळाडू बाजारात आघाडीवर आहेत. डिजिटल पेमेंट उद्योगातील प्रणेते, परंतु तरीही UPI-आधारित पेमेंटमुळे नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागले आहे. यूपीआय पेमेंट्सच्या वाढीमुळे, पेटीएम सारखी अॅप्स आता आपल्या मोबाईलवर सर्वाधिक वापरली जाणारी अॅप्स बनली आहेत. हे अॅप्स खूप पैसे कमवत नाहीत, परंतु यूजर्सची एंगेजमेंट वाढवतात. यूजर्सच्या एंगेजमेंटला इतर मार्गांनी व्यवस्थापित केली जाऊ शकते आणि कमाई केली जाऊ शकते. Paytm ने प्रवास आणि बुकिंग सुविधेसह अनेक सेवा देखील सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत पेटीएम कमाईमध्ये गुंतले आहे. जर पेटीएम आर्थिक सेवांशी संबंधित उत्पादनांची चांगली संख्या विकण्यात देखील यशस्वी झाली असेल तर, बँकिंग, विमा आणि गुंतवणूक उत्पादने वाढवू शकतात, तर दीर्घकाळात ते तेजीत येऊ शकतात. खेडेगावातल्या तरुणाला इंग्रजीही येत नव्हतं; असा उभारला Paytm चा डोलारा अन्.. स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे संशोधन प्रमुख संतोष मीना म्हणाले की, शॉर्ट टर्म गुंतवणूकदार यामध्ये राहू शकतात कारण नजीकच्या काळात काही परतावा मिळू शकतो. परंतु दीर्घकालीन दृष्टीकोनातून कोणतीही अपेक्षा यात नाही. त्यामुळे, दीर्घकालीन गुंतवणूकदार बाहेर पडू शकतात आणि घसरणीची प्रतीक्षा करू शकतात. आम्हाला वाटते की कंपनीने तिच्या ब्रँडच्या आधारावर हाय वॅल्यूएशनची मागणी केली आहे. यात शॉर्ट टर्ममध्ये काही सुधारणा दिसू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.