• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • सोन्याचांदीची झळाळी उतरली, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

सोन्याचांदीची झळाळी उतरली, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती (Gold price today) घसरल्याने देशांतर्गत बाजारातही दरामध्ये घसरण झाली आहे. बुलियन मार्केटमध्ये 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रति तोळा 312 रुपयांनी कमी झाली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 मे : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती (Gold price today) घसरल्याने देशांतर्गत बाजारातही दरामध्ये घसरण झाली आहे. बुलियन मार्केटमध्ये 24 कॅरेटच्या सोन्याची किंमत प्रति तोळा 312 रुपयांनी कमी झाली आहे. तर चांदींच्या किंमतीतही आज (Silver Price today) घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी चांदीच्या किंमती 655 रुपयांनी प्रति किलोग्राममागे कमी झाल्या आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर (ibjarates.com) सोन्या-चांदीच्या अपडेटेड किंमती पाहता येतील. किती स्वस्त झाले सोने? 99.99 शुद्धता असणारे म्हणजेच 24 कॅरेटच्या सोन्याच्या किंमती 47,298 रुपयांवरून 46,986 रुपये प्रति तोळावर पोहोचल्या आहेत. 14 मे रोजी सोन्याचे भाव 46246 रुपये प्रति तोळावर होते, पुढच्या दिवशी नवीन इतिहास रचत सोने प्रति तोळा 46791 रुपये झाले तर 18 मे रोजी सोने आतापर्यंतच्या सर्वात जास्त किंमतीवर म्हणजेच प्रति तोळा 47948 रुपयांवर जाऊन पोहोचले. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोन्यामध्ये कमालीची घसरण झाली. आज देखील सोन्याच्या किंमतीमध्ये 312 रुपयांची  घसरण झाल्याचे पाहायला मिळते आहे (हे वाचा-विमानप्रवास करताना मिळणार नाही या सेवा!करावं लागणार 7 महत्त्वाच्या नियमांचे पालन) मीडिया अहवालांनुसार देशभरातील मोठी ज्वेलर्सची दुकाने लवकरच उघडण्यात येणार आहेत. 1 जूनपासून सोन्याची सर्व दुकाने उघडली जाण्याची सूत्रांची माहिती आहे. सोन्याची स्पॉट किंमत म्हणजे काय? बाजारामध्ये ज्या किंमतीला तुम्ही सोन्याची खरेदी करता त्या किंमतीला सोन्याची स्पॉट किंमत म्हटले जाते. बहुदा अनेक शहरातील सराफा असोसिएशनचे सदस्य मिळून बाजार उघडण्यावेळी सोन्याचे भाव निश्चित करतात अन्य बातम्या लॉकडाऊनमध्ये बसला 440 वोल्टचा झटका! 2 महिने हॉटेल बंद तरी आलं 1.5 लाखांचं वीजबिल भयंकर! वाऱ्यामुळं एका क्षणात होत्याच नव्हतं झालं, पाहा थरारक VIDEO राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी 'नलिनी'च्या मुलीचं लंडनमध्ये झालंय शिक्षण
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: