Home /News /national /

राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी 'नलिनी'च्या मुलीचं लंडनमध्ये झालंय शिक्षण, गेल्यावर्षी झालं लग्न

राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी 'नलिनी'च्या मुलीचं लंडनमध्ये झालंय शिक्षण, गेल्यावर्षी झालं लग्न

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे मारेकरी दाम्पत्य नलिनी आणि मुरूगन यांची मुलगी हरिद्रा लंडनमध्ये राहते. तिने लंडनमध्येच राहून तिचं उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे.

  नवी दिल्ली, 21 मे : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. माजी 21 मे 1991 रोजी एका आत्मघातकी हल्ल्यामध्ये त्यांची हत्या करण्यात आली होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajeev Gandhi) यांच्या हत्याकांडातील आरोपी नलिनी श्रीहरन आजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे. दरम्यान तिला गेल्यावर्षी तिच्या मुलीच्या लग्नामध्ये सहभागी होण्यासाठी 30 दिवसांची पॅरोलदेखील मिळाली होती. तिने तिच्या मुलीला तुरूंगातच जन्म दिला होता. आता अशी माहिती आहे की, हरिद्रा त्याठिकाणी एका कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. जेलमध्ये दिला होता मुलीला जन्म नलिनीने 1991 मध्ये अटक होण्याआधी काही दिवसांपूर्वी तिरूपतीमध्ये मुरूगन नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं होतं. राजीव गांधी हत्याकांडाची सुनावणी सुरू असतानाच 1992 मध्ये तिने वेल्लोर जेलमध्ये मुलीला जन्म दिला. तिला आधी मेगारा नावाने ओळखले जायचे मात्र नंतर हरिद्रा श्रीहरन असे नाव देण्यात आले. हरिद्रा आईबरोबर जेलमध्येच राहायची नलिनीची मुलगी हरिद्रा वयाच्या सहा वर्षांपर्यंत आईबरोबर तुरूंगातच राहत होती. त्यानंतर ती तिच्या आजीकडे म्हणजे मुरूगनच्या आईकडे राहायला गेली. आजी तिला श्रीलंकेमध्ये घेऊन गेली. दक्षिण भारतातील वृत्तपत्रांमध्ये छापण्यात आलेल्या माहितीनुसार तिला सुरूवातीच्या काळात शाळेमध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागला. शाळेत देखील ती शांत असायची. 13 वर्षांची असताना ती आपल्या पालकांना भेटण्यास गेली होती, त्यावेळी तिने त्यांना एक प्रश्न विचारला की, 'तुम्ही असा मार्ग का स्वीकारला?' तिच्या या प्रश्नासाठी तिच्या पालकांकडे उत्तर नव्हते. 2006 मध्ये हरिद्रा भारतात आली होती जानेवारी 2006 मध्ये हरिद्राला भारतीय एजन्सीकडून भारतात येण्याचा व्हिसा मिळाला. तिने वेल्लोरमध्ये जाऊन तिच्या पालकांची भेट घेतली. हरिद्राचे सुरूवातीचे शिक्षण श्रीलंकेत झाले असून त्यानंतर ती लंडनमध्ये गेली. ती नॉर्वेमध्ये राहत असल्याची माहिती भारतीय एजन्सीना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार हरिद्राने लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केले. 2011 मध्ये तिने यूकेच्या ग्लास्गो यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले. तिने बायोमेडिसिनचे शिक्षण घेतल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी तिचे लग्न झाले आहे. पालकांची शिक्षा माफ करण्याचं केलं होतं अपील नलिनी आणि मुरूगन दोघांनाही फाशीची शिक्षा झाली होती. हरिद्राला जन्म दिल्यामुळे सोनिया गांधी यांनी त्यांची फाशीची शिक्षा रद्द करून आजीवन कारावासाची शिक्षा द्यावी असे अपील केले होते. 2000 साली नलिनीची फाशीची शिक्षा आजीवन कारावासामध्ये बदलण्यात आली. नलिनी श्रीहरन
  नलिनी श्रीहरन
  2008 मध्ये प्रियांका गांधी यांनी देखील नलिनीची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी नलिनीला सवाल केला होता की का तिने राजीव गांधींना मारले. दरम्यान हरिद्राने तिच्या पालकांची शिक्षा माफ करण्यासाठी अपील देखील केले होते. संकलन, संपादन - जान्हवी भाटकर
  Published by:Janhavi Bhatkar
  First published:

  Tags: Rajiv gandhi

  पुढील बातम्या