Home /News /national /

लॉकडाऊनमध्ये बसला 440 वोल्टचा झटका! 2 महिने हॉटेल बंद तरी आलं 1.5 लाखांचं वीजबिल

लॉकडाऊनमध्ये बसला 440 वोल्टचा झटका! 2 महिने हॉटेल बंद तरी आलं 1.5 लाखांचं वीजबिल

एकीकडे लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद करण्यात आल्यामुळं आधीच उत्पन्नावर कात्री आलेल्या लोकांना आता जादा वीजबिलाची चिंता सतावत आहे.

    शिमला, 21 मे : कोरोना संकटात बर्‍याच लोकांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत. एकीकडे लॉकडाऊनमध्ये हॉटेल बंद करण्यात आल्यामुळं आधीच उत्पन्नावर कात्री आलेल्या लोकांना आता जादा वीजबिलाची चिंता सतावत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये तर धक्कादायक प्रकार घडला. येथील लोकांना वीजबिल 2 ते 3 पट आले आहे. काही लोकांनी याबाबत तक्रारीही केल्या आहेत. दरम्यान शिमलामधील एका हॉटेल गेले दोन महिने बंद आहे. तरी, या हॉटेलचं बिल तब्बल 1.5 लाख रुपये आलं आहे. तर, हर्षवर्धन नावाच्या मुलगा भाड्याच्या घरात राहणारा विद्यार्थी असून विद्युत मंडळानं त्याला 4700 रुपयांचे बिल दिले आहे, जे दोन महिन्यांचे आहे. दरम्यान खायला पैसे नसताना बिल कसं भरायचे असा प्रश्न आता लोकांसमोर आहे. वाचा-महाराष्ट्र हादरला! कोरोनामुळे एकाच दिवशी पोलिस दलातील तीन अधिकऱ्यांचा मृत्यू हॉटेल 2 महिन्यांपासून बंद शिमलामधील समरहिल येथील एका हॉटेल मालकाला दोन महिन्यांपासून बंद असलेल्या हॉटेलचे बिल दीड लाख रुपये आलं. तर, त्यांनी विद्युत मंडळाच्या जवळच्या कार्यालयात तक्रार दिली आहे. आतापर्यंत राज्यातील 12 लाख ग्राहकांना अशीच बिलं दिली गेली आहेत, तर अद्याप 10 लाखाहून अधिक ग्राहकांना बिलं देण्यात आलेली नाहीत. या संदर्भात राज्य विद्युत मंडळाचे मुख्यालय आरके शर्मा यांनी सांगितले की, राज्यात कर्फ्यूमुळे बोर्ड कर्मचार्‍यांना मीटर रीडिंगसाठी घरोघरी जाता आलं नाही त्यामुळे सरासरी बिल दिले गेले. ही सरासरी मागील वर्षी ग्राहकांचा वीज वापरावर देण्यात आली आहेत.  मागील वर्षाच्या चालू महिन्यांत जितके जास्त सेवन केले तितके या वेळेस या खर्चाचे बिल देण्यात आले आहे. वाचा-आता फक्त 10 मिनिटांत होऊ शकता कोरोनाचे शिकार, समोर आला नवा रिपोर्ट ग्राहकांनी घाबरू नये: आरके शर्मा दरम्यान शर्मा यांनी, ग्राहकांनी घाबरू नये असे सांगितले आहे. ज्यांना हे बिल जास्त आहे असे वाटते, ते जवळच्या विभाग कार्यालयात जाऊन तक्रार करू शकतात. ते म्हणाले की, ज्याला संपूर्ण बिल जमा करता येत नाही, तो हप्त्यांमध्ये बिल जमा करू शकतात. वाचा-कोरोनामुळे मृत्यू झाला तर शवविच्छेदन करण्याची गरज आहे का? ICMR चा मोठा खुलासा
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या