Home /News /money /

विमानप्रवास करताना मिळणार नाही या सेवा! करावं लागणार 7 महत्त्वाच्या नियमांचे पालन

विमानप्रवास करताना मिळणार नाही या सेवा! करावं लागणार 7 महत्त्वाच्या नियमांचे पालन

25 मेपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र ही सेवा सुरू झाल्यानंतर काही नियमांचे पालन करणे आवश्यक असेलच पण त्याचबरोबर काही सुविधा देखीलं मिळणं बंद होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 20 मे : 2 महिन्याच्या प्रतिक्षेनंतर अखेर भारतामध्ये सोमवारपासून टप्प्या टप्प्याने विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी बुधवारी अशी माहिती दिली आहे की, देशामध्ये 25 मे म्हणजेच सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. पुरी यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे की सोमवारपासून देशांतर्गत विमानांचे उड्डाण सुरू केले जाईल. यासंदर्भात सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना उड्डाणासाठी आणि इतर व्यवस्थांसाठी तयार राहण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत. सर्व विमानतळं याकरता तयार आहेत. दरम्यान त्याआधी एएआय (Airports Authority of India)ने काही नियमावली जाहीर केली आहे, ज्याचे प्रवासी आणि विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना पालन करणे अनिवार्य राहणार आहे. काय आहेत AAI चे नियम ? 1. केवळ वेब-चेकइनची परवानगी (हे वाचा-अखेर 25 मे रोजी आकाशात झेपावणार विमानं! सोमवारपासून होणार देशांतर्गत विमानसेवा सुरू) 2. केबिन लगेज नेण्यासाठी परवानगी नाही आहे 3. फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे आवश्यक 4. मास्क आणि ग्लोव्ह्ज घालणे अनिवार्य 5. 4 फुटांचे अंतर राखणे आवश्यक 6. एअरपोर्ट कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे आवश्यक 7. प्रवासी त्यांच्याबरोबर 350 मिलीलीटर हँड सॅनिटाइझर घेऊन जाऊ शकतात. केबिन क्रूसाठी PPE आवश्यक विविध विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मात्र जोपर्यंत सरकारकडून कोणत्या गाइडलाइन्स जारी केल्या जात नाहीत तोपर्यंत विमानकंपन्या देखील त्याबाबत स्पष्ट काही सांगू शकत नाहीत. मात्र अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की पायलट, एअर हॉस्टेस आणि फ्लाइटमधील इतर केबिन क्रूसाठी पीपीई किट अनिवार्य केले जाऊ शकते नाही मिळणार या सुविधा -आधी बिझनेस क्लासमधील प्रवाशांना फ्लाइटमध्ये आल्यानंतर लगेच वेलकम ड्रिंक, मेन्यू कार्ड, मॅगझीन, न्यूजपेपर, हॉट टॉवेल, चहा किंवा कॉफी आणि इतर व्हीआयपी सेवा दिल्या जायच्या. यावर आता मर्यादा आणली जाईल -प्रवाशांनी हँड बॅगेज घेऊन जाऊ नये (हे वाचा-Amphan Cyclone : वादळात उडाली शेड आणि बराच वेळ उडत राहिल्या ठिणग्या, पाहा VIDEO) -प्रवाशांना फ्लाइटमध्ये सहप्रवाशांबरोबर अंतर ठेवावे लागेल तसचं एकमेकांच्या वस्तूंना हात लावता येणार नाही -विमानात प्रवेश केल्यानंतर कदाचित कुणी प्रवाशांचे स्वागत करणार नाही -दिल्ली विमानतळाच्या टी-3 वर असा प्रयत्न सुरू आहे की लगेज नसणाऱ्या प्रवाशांसाठी वेगळा कॉरिडॉर बनवण्यात येईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या