जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सोन्याला पुन्हा झळाळी, लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ

सोन्याला पुन्हा झळाळी, लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ

सोन्याला पुन्हा झळाळी, लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ

गेल्या 2 दिवसांपासून सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. मात्र सलग दोन दिवस सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाल्यानंतर गुरुवारी सोन्याचे भाव वाढले.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 30 जानेवारी : ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. मात्र सलग दोन दिवस सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाल्यानंतर गुरुवारी सोन्याचे भाव वाढले. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति तोळा 400 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या भावातही कालच्या तुलनेत वाढ झालेली पाहायला मिळाली. चांदीमध्ये प्रति किलो 737 रुपयांची वाढ झाली आहे. चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अनेक गुंतवणुकदारांकडून गोल्ड सेफ इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढ झाली. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सोन्या-चांदीचे भाव वधारले आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली रुपयाची घसरण आणि लग्नासराईचे दिवस असल्यामुळे सोन्याचांदीच्या किमतीत वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे भाव प्रतितोळा 41 हजार 124 रुपयांवरून 41 हजार 524 रुपये झाले आहेत. (हेही वाचा :  SBIच्या ग्राहकांना KYC अपडेट करण्यासाठी डेडलाईन  ) चांदीच्या किमतीत प्रति किलो 737 रुपयांची वाढ होत चांदीची किंमत 46 हजार 655 रुपयांवरुन 47 हजार 392 झाली आहे. भारतात सोन्याची मागणी घटली 2019 या वर्षात भारतामध्ये सोन्याची मागणी 9 टक्क्यांनी घटल्य़ाचं World Gold Council चं म्हणणं आहे. आशियातील या मोठ्या अर्थव्यवस्थेने सोनेखरेदीकडे पाठ फिरवली आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांमधून दागिन्यांच्या मागणीमध्ये 80 टक्के घसरण झाली आहे. या वर्षात भारतामध्ये सोन्याची मागणी 690.4 टन एवढी होती, तर 2020मध्ये ही मागणी वाढून 700 ते 800 टनपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अन्य बातम्या लाखो कर्मचाऱ्यांची EPF खाती ब्लॉक, यात तुमचं खातं तर नाही ना? BUDGET 2020 : 1 फेब्रुवारीनंतर तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम नाईट लाईफ… ते काय असतं? सैराटफेम आर्चीचा ‘निरागस’ प्रश्न

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात