Home /News /money /

SBI Alert : बँकेने पाठवलाय महत्त्वाचा मेसेज, गांभीर्याने वाचला नाहीत तर अकाउंट होईल ब्लॉक

SBI Alert : बँकेने पाठवलाय महत्त्वाचा मेसेज, गांभीर्याने वाचला नाहीत तर अकाउंट होईल ब्लॉक

जर तुम्ही SBIचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. SBIच्या ग्राहकांना बँकेकडून एक Alert SMS पाठवण्यात आला आहे. ग्राहकांनी अत्यंत गांभीर्याने या SMSकडे लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा ग्राहकांच्या बँकेतील व्यवहारांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 जानेवारी : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. SBIचे ग्राहक असाल तर बँकेकडून पाठवण्यात आलेला एक SMS तुम्हालाही आला असेल. या SMSकडे दुर्लक्ष कराल तर मोठ्या नुकसानाला तुम्हाला सामोरे जावे लागेल. या महत्त्वाच्या SMS नुसार 28 फेब्रुवारीपर्यंत SBIच्या ग्राहकांना KYC अपडेट करावी लागणार आहे. अन्यथा ग्राहकाच्या बँकेतील व्यवहारावर रोख लावण्यात येणार आहे. त्यामुळे 28 फेब्रुवारीपर्यंत SBIच्या ग्राहकांना आपली सर्व कागदपत्र बँकेत जमा करुन KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासंदर्भात SBIने आपल्या ग्राहकांना Alert SMS पाठवला आहे. ग्राहकांनी SBIच्या या सूचनेचं पालन न केल्यास त्यांची खाती फ्रीज होऊ शकतात. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सर्वच बँकांमध्ये KYC करणं अनिवार्य आहे. केवायसी (Know Your Customer) म्हणजे आपल्या ग्राहकाबाबत सर्व माहिती असणे. ग्राहकांचं बँकेसोबतचे व्यवहार सुखकर व्हावेत याकरता KYC अत्यंत आवश्यक आहे.  त्यामुळेच  SBIकडून ग्राहकांना Alert SMS पाठवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुचनांनुसार ही प्रक्रिया करण्यात येत असल्याचं SBIकडून सांगण्यात आलं आहे. ग्राहकांना आता काय करावं लागेल? KYC अपडेट करण्याकरता ग्राहकांना आपल्या जवळच्या SBI शाखेमध्ये जाऊन अद्ययावत कागदपत्र द्यावी लागतील. नाहीतर भविष्यात ग्राहकांना बँकेचे व्यवहार करण्यावर रोख लावण्यात येईल. ग्राहकांची खाती देखील बँकेकडून फ्रीज केली जातील. SBIच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार केवायसीसाठी द्याव्या लागणाऱ्या कागदपत्रांवर तोच पत्ता असणं अनिवार्य आहे जो बँकेतील खात्यासाठी भरलेल्या फॉर्म असेल. त्यामुळे SBI कडून पाठवण्यात आलेला Alert SMS ग्राहकांना अत्यंत गांभीर्याने वाचणं गरजेचं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या