लाखो कर्मचाऱ्यांची PF खाती ब्लॉक, यात तुमचं खातं तर नाही ना?

लाखो कर्मचाऱ्यांची PF खाती ब्लॉक, यात तुमचं खातं तर नाही ना?

तुम्ही नोकरी करत असाल तर पीएफचं खातं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळेच पीएफबद्दल ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. EPFO ने लाखो कर्मचाऱ्यांची खाती ब्लॉक केली आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 जानेवारी : तुम्ही नोकरी करत असाल तर पीएफचं खातं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळेच पीएफबद्दल ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (Employees Provident Fund Organisation- EPFO) ने 9 लाख कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ब्लॉक केली आहेत. सरकारी योजनांचा फायदा उठवणाऱ्या सुमारे 80 हजार कंपन्यांची सरकारने यादी केली आहे. या कंपन्यांनी फॉर्मल सेक्टरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्राच्या फ्लॅगशिप योजनेअंतर्गत बेकायदेशीर पद्धतीने 300 कोटी रुपयांचा फायदा उचलला आहे.

बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या अहवालानुसार प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेच्या 9 लाख लाभार्थ्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलं. ही योजना लागू होण्यापूर्वीच ते फॉर्मल सेक्टरचा भाग होते, म्हणजेच ते आधीपासूनच पीएफचा लाभ घेत होते. या अहवालानुसार, EPFOने या कर्मचाऱ्यांची प्रॉव्हिडंट फंडची खाती ब्लॉक केली आहेत. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांकडून 222 कोटी रुपयांची वसुलीही करण्यात आली आहे.

असा चेक करा पीएफ बॅलन्स

- तुमचं पीएफ खातं ब्लॉक झालं असेल तरी तुम्ही बॅलन्स किती आहे ते चेक करू शकता. यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये EPFO चं ‘m-EPF’ डाऊनलोड करा. या अ‍ॅपमध्ये 'Member' वर क्लिक करा आणि त्यानंतर Balance/Passbookवर क्लिक करा. त्यानंतर UAN नंबर आणि रजिस्टर मोबाईल नंबर टाकून आपला EPF बॅलन्स चेक करा.

(हेही वाचा : Jio's Got Talent : 10 सेकदांच्या व्हिडिओमुळे होऊ शकते 'थायलंड'वारी)

- याशिवाय उमंग अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही पीएफ बॅलन्स चेक करू शकता. यासाठी उमंग अ‍ॅपमध्ये मोबाईल नंबरच्या मदतीने वन टाइम रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यानंतर या अ‍ॅपमध्ये तुम्ही EPF पासबुकही पाहू शकता. Claim Raise आणि Track देखील करू शकता.

- SMSच्या माध्यमातूनही आपण EPF बॅलन्स चेक करू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर ‘EPFOHO UAN ENG’ असा मेसेज करावा लागेल. SMS करताना ENG ऐवजी तुमच्या भाषेची पहिली 3 कॅरेक्टर टाकून ही माहिती मिळू शकते. त्यामुळे इंग्लिश (ENG) ऐवजी तुम्ही तुमच्या भाषेतून माहिती मिळवू शकता. ही सुविधा इंग्रजीशिवाय हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड़, तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि बंगाली भाषेत उपलब्ध आहे. SMSच्या माध्यमातून EPFO बॅलन्स जाणून घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर UAN मध्ये रजिस्टर असणं आवश्यक आहे.

(हेही वाचा : Brexit : 31 जानेवारीला ब्रिटन EU मधून पडणार बाहेर, भारतावर होणार हा परिणाम)

- मिस्ड कॉलच्या माध्यमातूनही EPF बॅलन्स चेक करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर UAN सोबत रजिस्टर असणं आवश्यक आहे. आपल्या रजिस्टर मोबाइलवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल देऊन EPF बॅलन्स काय आहे ते जाणून घेऊ शकतो.  मिस्ड कॉल दिल्यानंतर तुमच्या रजिस्टर नंबरवर  EPFचा एक मेसेज येईल. या मेसेजमध्ये PF Number, नाव, जन्मतारीख, EPf बॅलन्ससोबतच एकूण शिल्लक ही सर्व माहिती देण्यात येईल.

=======================================================================================

First published: January 30, 2020, 4:05 PM IST

ताज्या बातम्या