सुवर्णसंधी! 1,097 रुपयांनी घसरले सोन्याचे दर, शुक्रवारचे भाव इथे पाहा

सुवर्णसंधी! 1,097 रुपयांनी घसरले सोन्याचे दर, शुक्रवारचे भाव इथे पाहा

दिल्लीतील सराफा बाजारातील सोन्याचे दर खूशखबरी देणार आहेत. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर (Gold Prices today) कमी झाले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मार्च : दिल्लीतील सराफा बाजारातील सोन्याचे दर खूशखबरी देणार आहेत.  सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर (Gold Prices today) कमी झाले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वधारली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत 1,097 रुपयांनी घसरली आहे. मागणी कमी झाल्यामुळे प्रति किलो चांदीच्या किंमतीतही (Silver prices today) 1,574 रुपयांची घसरण झाली आहे. गुरूवारी डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला होता. त्यामुळे कमी प्रमाणातच सोनं घसरलं होत. मात्र आज रुपया वधारल्यामुळे जवळपास 1,097 रुपयांची घसरण झाली आहे.

सोन्याचे नवे भाव

गुरूवारी दिल्लीतील सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत 1,097 रुपयांनी घसरल्यानंतर प्रति तोळा सोन्याची किंमत (gold prices today)  42,600 रुपये झाली आहे.

(हे वाचा- केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढणार, सरकारचा मोठा निर्णय)

गुरूवारी सोन्याची किंमत 128 रुपयांनी कमी होऊन 44,490 रुपये प्रति तोळा होती. बुधवारी सोन्याची किंमत 44,618 रुपये प्रति तोळावर बंद झाली होती.

चांदीचे नवे भाव

सोन्यापाठोपाठ चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे. आज चांदीचे दर प्रति किलो 1,574 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात चांदीचे आजचे दर प्रति किलो 44,130 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

सोन्याचांदीच्या किंमतीत घसरण होण्याचं कारण

HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरबीआयने उचललेल्या पावलांमुळे रुपयाची किंमत वधारली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या किंमती घसरल्या आहेत.

कशी कराल घरबसल्या कमाई?

-2013 नंतर अनेकांनी फिजिकल गोल्ड व्यतिरिक्त अन्य पर्यांयांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आहे. गुंतवणूक करणाऱ्यांना पेपर गोल्ड (paper gold) मध्ये अधिक पर्याय उपलब्ध आहेत.

(हे वाचा-येस बँकेच्या पुनर्रचनेसाठी कॅबिनेटची मंजूरी, SBI करणार 7,250 कोटींची गुंतवणूक)

-सोन्यामध्ये गुंतवणूक करण्या व्यतिरिक्त गोल्ड डिलीव्हरीचा सुद्धा पर्याय आहे. गुंतवणुकदारां व्यतिरिक्त सामान्य नागरिक सुद्धा पेटीएम गोल्ड, सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड, गोल्ड ETF यांसारख्या पर्यांयाचा फायदा घेऊ शकता.

-एमसीएक्स गोल्ड गुंतवणुकदारांना कमीत कमी 1 ग्रॅम सोनं खरेगी करण्याचा पर्याय देत आहे. एमसीएक्स गोल्डच्या या गुंतवणुकीमध्ये कमीत 1 ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करूनही डीमॅट अकाउंट ठेऊ शकता.

First published: March 13, 2020, 6:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading