केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय, एवढ्या टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय, एवढ्या टक्क्यांनी वाढणार महागाई भत्ता

केंद्रीय कर्मचारी (Central Government Employee) आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA-Dearness Allowance) वाढवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 मार्च : केंद्रीय कर्मचारी (Central Government Employee) आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (DA-Dearness Allowance) वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राच्या कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यापैकी महागाई भत्त्याबाबत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘CNBC आवाज’ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार कोलमडलेल्या ‘येस बँके’ला (Yes Bank) सावरण्यासाठी रिस्ट्रक्चरिंग प्लॅनला सुद्धा मंजूरी मिळाली आहे. त्याचप्रमाणे या बैठकीमध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे अर्थव्यवस्थेच्या नुकसानाबाबतही या बैठकीमध्ये चर्चा झाली.

(हे वाचा-फोन खरेदी करताय तर जरा थांबा! कमी किंमतीत विकत घेऊ शकता नवा मोबाइल)

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणारा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी राज्यसभेत लेखी स्वरूपात माहिती दिली होती की, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मार्चपासून महागाई भत्ता मिळू लागेल.

महागाई भत्त्याचा फायदा आणि इतिहास

सरकारी कर्मचाऱ्यांचं राहणीमान उंचावण्यासाठी, त्यांना महागाई भत्त्यांच्या स्वरुपात ठराविक रक्कम देण्यात येते. जगभरात केवळ भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्येच सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येतो. महागाई वाढल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना जीवनमान जगताना कोणतीही अडचण येऊ नये, याकरता हा भत्ता देण्यात येतो. सरकारी कर्मचारी, पब्लिक सेक्टर कर्मचारी आणि पेन्शनधाकांना महागाई भत्ता मिळतो. महागाई भत्त्याची सुरूवात दुसऱ्या महायुद्धादरम्यान झाली होती. जेवणाच्या तसेच इतर काही सुविधांसाठी शिपायांना पगाराव्यतिरिक्त अधिक पैसा दिला जायचा. त्यावेळी या रकमेला खाद्य महागाई भत्ता असे म्हटलं जायचं. पगारवाढ झाल्यानंतर या रकमेतही वाढ होत असे.

(हे वाचा-रुपया घसरल्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी सोनं उतरलं, गुरूवारचे दर इथे वाचा)

भारतात मुंबईमध्ये कपड्याच्या उद्योगामध्ये 1972 साली सर्वात पहिल्यांदा महागाई भत्ता देण्यास सुरूवात झाली होती. यांनंतर केंद्र सरकारकडून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येऊ लागला. 1972 मध्ये यासंदर्भात एक कायदा बनवण्यात आला, ज्यानुसार ऑल इंडिया सर्व्हिस अक्ट, 1951 अंतर्गत कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यात येत आहे.

First published: March 13, 2020, 1:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading