मराठी बातम्या /बातम्या /मनी /

येस बँकेच्या पुनर्रचनेसाठी कॅबिनेटची मंजूरी, SBI करणार 7,250 कोटींची गुंतवणूक

येस बँकेच्या पुनर्रचनेसाठी कॅबिनेटची मंजूरी, SBI करणार 7,250 कोटींची गुंतवणूक

संकटग्रस्त येस बँकमध्ये (Yes Bank) 7,250 कोटी रुपये गुंतवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला परवानगी मिळाली आहे.

संकटग्रस्त येस बँकमध्ये (Yes Bank) 7,250 कोटी रुपये गुंतवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला परवानगी मिळाली आहे.

संकटग्रस्त येस बँकमध्ये (Yes Bank) 7,250 कोटी रुपये गुंतवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला परवानगी मिळाली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 13 मार्च : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) येस (Yes) बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहे. दरम्यान संकटग्रस्त येस बँकमध्ये (Yes Bank) 7,250 कोटी रुपये गुंतवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ला परवानगी मिळाली आहे. गुंतवणुकीसंदर्भात SBIने काल माहिती दिली होती. एसबीआयने BSE ला सांगितलं की, ‘केंद्रीय बोर्डाच्या कार्यकारी समितीची 11 मार्चला बैठक झाली. त्यामध्ये 10 रुपये प्रति शेअर या दराने येस बँकेचे 725 कोटी शेअर खरेदी करण्यास परवानगी मिळाली आहे.  या करारास अद्याप नियामक मान्यता मिळाणं बाकी आहे. या करारानंतर येस बँकेतील एसबीआयची भागीदारी एकूण देय भांडवलाच्या 49 टक्क्यांपेक्षा जास्त जाणार नाही.’ दरम्यान  कॅबिनेटच्या आजच्या बैठकीमध्ये एसबीआयला येस बँकेत गुंतवणूक करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. (हे वाचा-केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढणार, सरकारचा मोठा निर्णय) रिझर्व्ह बँकेने येस बँकेच्या पुनर्रचनेबाबत मागील आठवड्यात एका योजनेचा मसुदा जाहीर केला होता. RBI च्या मसुद्यातील महत्त्वाचे मुद्दे -आरबीआयने म्हटलं आहे की, येस बँकेत गुंतवणूक करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने इच्छा व्यक्त केली होती. एसबीआय येस बँकेच्या पुनर्रचनेमध्ये सहभागी होईल. -पुनर्रचित येस बँकेच्या सर्व कर्मचार्‍यांना सध्याच्या वेतनश्रेणीवर पगार मिळेल. ही व्यवस्था पुढील 1 वर्ष राहील. -पुनर्रचित बँकेचे अथॉराइज्ड कॅपिटल बदलून 5 हजार कोटी रुपये केले जाईल. तसेच प्रति शेअर 2 रुपये दराने 24 हजार कोटी रुपयांच्या इक्विटी शेअरमध्येही बदल करावा. यानंतर ही रक्कम 48 हजार कोटी रुपये होईल (हे वाचा-‘कोरोना’मुळे सुरुवातीला 3100 अंकानी कोसळलेला सेन्सेक्स वधारला) -नव्या बँकेत गुंतवणूक करणारी बँक आपली भागीदारी 26 टक्क्यांपेक्षा कमी करणार नाही. इन्फ्यूजनच्या तारखेपासून पुढील 3 वर्षे हे अनिवार्य असेल -पुनर्गठित नवीन बँकेच्या इक्विटीमध्ये गुंतवणूकदार बँक 49 टक्केपर्यंत वाढ करू शकेल. यासाठी प्रत्येक शेअरची किंमत 10 रुपयांपेक्षा जास्त नसावी. ही किंमत 2 रुपये प्रति फेस व्हॅल्यू आणि 8 रुपये प्रीमियम किंमतीपेक्षा जास्त असू नये. -पुनर्गठित बँकेसाठी नवीन बोर्ड स्थापन केले जाईल. -या योजनेअंतर्गत पुनर्रचना केलेल्या बँकेच्या संचालक मंडळास अशी परवानगी असेल की, ते मुख्य व्यवस्थापकीय कर्मचार्‍यांनी घेतलेला निर्णयामध्ये योग्य प्रक्रियेअंतर्गत बदल करू शकतात. -नवीन बोर्डावर इन्व्हेस्टर बँकेचे 2 नॉमिनी डायरेक्टर असतील. -आरबीआय अतिरिक्त संचालकांची नेमणूक करू शकते.
First published:

पुढील बातम्या