नवी दिल्ली, 31 डिसेंबर: पैसे गुंतवण्याच्या विविध पर्यायांमध्ये फिक्स्ड डीपॉझिट-एफडी (Fixed Deposit- FD) हा सुरक्षित पर्याय मानला जातो. यामध्ये बचत खात्यापेक्षा (Savings Account)अधिक चांगला परतावा मिळतो. प्रत्येक बँकेचे एफडीचे (FD) व्याजदर वेगवेगळे असतात. सर्वसामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen)अर्धा टक्का वाढीव व्याजदरही मिळतो. सध्या काही बँका एफडीवर चांगला व्याजदर देत आहेत. त्यांची माहिती खाली देत आहोत.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 7 ते 45 दिवसांच्या एफडीसाठी सध्या वार्षिक 2.9 टक्के दरानं व्याज देत आहे. तर 46 ते 179 दिवसांसाठी 3.9 टक्के व्याजदर आहे. 180 दिवस ते 1 वर्षांपेक्षा कमी दिवसांसाठी 4.4 टक्के व्याजदर आहे. 1 ते 2 वर्ष मुदतीसाठी 4.9 टक्के, 2 वर्ष ते 3 वर्षापर्यंतच्या मुदतीसाठी 5.1 टक्के, 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीकरता 5.3 टक्के व्याजदर आहे. 5 वर्ष ते 10 वर्षांच्या मुदतीसाठी 5.4 टक्के व्याजदर दिला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्के (50bps)अतिरिक्त व्याजदर देण्यात येतो. त्यामुळं ज्येष्ठ नागरीकांना 7 दिवस ते दहा वर्षे मुदतीच्या एफडीवर 6.2 टक्के व्याजदर मिळतो.
(हे वाचा-सुस्साट! 180 किमी ताशी वेगाने धावणारी ट्रेन, पाहा खास सुविधांचे INSIDE PHOTOS)
पंजाब नॅशनल बँक (PNB)
ही बँक 7 ते 45 दिवसांच्या एफडीसाठी वार्षिक 3 टक्के दरानं व्याज देते. 1 वर्षांपेक्षा कमी दिवसांसाठी 4.5 टक्के व्याजदर आहे, तर 1 ते 3 वर्ष मुदतीसाठी 5.20 टक्के आणि 5 ते 10 वर्षांच्या मुदतीकरता 5.25 टक्के व्याजदर आहे.
एचडीएफसी बँक (HDFC)
एचडीएफसी बँक (HDFC) 7 ते 29 दिवसांच्या एफडीसाठी वार्षिक 2.50 टक्के दरानं व्याज देते. 30 ते 90 दिवसांसाठी 3 टक्के, 91 दिवस ते 6 महिने मुदतीसाठी 4.4 टक्के तर 1 ते 2 वर्षांच्या मुदतीकरता 4.90 टक्के व्याजदर आहे. 2 ते 3 वर्षांच्या मुदतीसाठी 5.15 टक्के, 3 ते 5 वर्षासाठी 5.30 टक्के आणि 5 ते 10 वर्षांच्या मुदतीकरता 5.50 टक्के व्याजदर दिला जात आहे.
(हे वाचा-EPFO खातेधारकांना मिळणार सरकारचं गिफ्ट!6 कोटी लोकांच्या खात्यात येतील PF चे पैसे)
बँक ऑफ बडोदा (BOB)
बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) एफडीवर 7 ते 45 दिवसांसाठी 2.80 टक्के दरानं व्याज देते. 46 ते 180 दिवसांसाठी 3.70 टक्के, 181 दिवस ते 270 दिवसांच्या मुदतीसाठी 4.30 टक्के व्याजदर आहे. 271 दिवसांपेक्षा अधिक आणि 1 वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी 4.40 टक्के, 1 वर्षाच्या मॅच्यूरिटीवर बँक 5 टक्के दरानं व्याज देते आहे. 1 वर्षापेक्षा जास्त ते 2 वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी 5 टक्के, 2 वर्ष ते 3 वर्ष मुदतीकरता 5.10 टक्के व्याजदर आहे. 3 ते 10 वर्षांच्या मुदतीसाठी 5.25 टक्के व्याजदर दिला जात आहे.
कॅनरा बँक
कॅनरा बँकेतर्फे (Canara Bank) 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 2.95 टक्के दरानं व्याज देण्यात येते. 46 ते 90 दिवसांसाठी 3.90 टक्के, 180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी 4.45 टक्के व्याजदर आहे. 1 वर्ष मॅच्यूरिटीसाठी 5.25 टक्के दराने व्याज देते आहे. 1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपर्यंत मुदतीसाठी 5.20 टक्के, तर 2 वर्षापेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी मुदतीकरता 5.40 टक्के व्याजदर आहे. 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी 5.50 टक्के व्याजदर दिला जात आहे.