Home » photogallery » auto-and-tech » INDIAN RAILWAY COMPLETES TRIAL OF VISTADOME COACHES WITH SPEED UP TO 180 KMPH RAILWAY MINISTER PIYUSG GOYAL SHARED FEW PICTURES MHJB
सुस्साट! 180 किमी ताशी वेगाने धावणारी ट्रेन, पाहा खास सुविधांचे INSIDE PHOTOS
भारतीय रेल्वे (Indian Railway) ने 180 किमी ताशी वेगाने धावणाऱ्या एका ट्रेनची चाचणी पूर्ण केली आहे. या गाडीतील कोच विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. रेल्वे मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
|
1/ 9
विस्टाडोम कोच (Vistadome Coach) मध्ये आरामदायक प्रवासासाठी बोगीला एअर स्प्रिंग सस्पेन्शनवर तयार केले आहे. या ट्रेनच्या कोचमध्ये मोठ्या काचेच्या खिडक्या आणि ग्लास रुफ देखील आहे, जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून नियंत्रणात ठेवले जाइल. प्रवासी या पारदर्शी छतातून पॅनोरॅमिक व्ह्यूचा नजारा पाहू शकतात.
2/ 9
रेल्वेच्या या डब्यांतील रिक्लायनिंग सीट्सना विशिष्ट पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे, ज्या 180 डिग्री पर्यंत वळवता येतील
3/ 9
एकूण या ट्रेनमध्ये 10 रेल्वेडबे असतील. या संपूर्ण कोच 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे.
4/ 9
विशेष म्हणजे या डब्यातील सीट्सच्या आर्मरेस्टच्या बरोबर खाली एक चार्जिंग सॉकेट देण्यात आले आहे. मनोरंजन प्रणालीमध्ये डिजिटल डिस्प्ले स्क्रीन आणि स्पीकर्सची सुविझा आहे. शिवाय प्रवाशांना त्यांच्या वैयक्तिक डिव्हाइसवर वायफायची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल.
5/ 9
यामध्ये GPS शी जोडलेली पब्लिक अॅड्रेस कम पॅसेंजर इन्फर्मेशन सिस्टम (PAPIS) देखील आहे. यामध्ये एलईडी डेस्टिनेशन बोर्ड देखील असणार आहे. पॅसेंजर एरियाबाहेर सामान ठेवण्यासाठी स्टेनलेस स्टीलपासून बनवण्यात आलेलं मल्टी टियर लगेज रॅक देखील आहे.
6/ 9
या ट्रेनच्या डब्ब्यांमध्ये सीसीटीव्ही देखील असणार आहे. खास बाब म्हणजे या ट्रेनच्या डब्यांचे इंटिरियर विशेष डिझाइन करण्यात आलं आहे
7/ 9
पॅसेंजर्ससाठी मिनी पँट्रीची सुविधा देखील दिली जाणार आहे. सर्व्हिस एरियामध्ये हॉट केस, मायक्रोव्हेव ओव्हन, कॉफी मेकर, बॉटल कुलर, फ्रिज आणि वॉश बेसिन असेल
8/ 9
या डब्यांमध्ये एफआरपी मॉड्यूलप टॉयलेटमध्ये प्रेशराइज्ड फ्लशिंग सिस्टम असेल आणि बायो टँक देखील असणार आहे. फाय डिटेक्शन आणि अलार्म सिस्टिम देखील मिळमार आहे.
9/ 9
दिव्यांग व्यक्तींसाठी मोठी दरवाजे आणि व्हीलचेअर या सुविधा देखील मिळतील. रेल्वे डब्याच्या दोन्ही बाजूला एंट्रीच्या ठिकाणी ऑटोमॅटिक स्लायडिंग दरवाजे असतील.