Home /News /money /

EPFO खातेधारकांना मिळणार सरकारचं गिफ्ट! 6 कोटी लोकांच्या खात्यात आज येतील PF चे पैसे

EPFO खातेधारकांना मिळणार सरकारचं गिफ्ट! 6 कोटी लोकांच्या खात्यात आज येतील PF चे पैसे

पीएफ खातेधारकांसाठी (PF Account-Holders)अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नवीन वर्ष कोट्यवधी पीएफ खातेधारकांसाठी आनंदाचं ठरणार आहे.

    नवी दिल्ली, 31 डिसेंबर: पीएफ खातेधारकांसाठी (PF Account-Holders)अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नवीन वर्ष कोट्यवधी पीएफ खातेधारकांसाठी आनंदाचं ठरणार आहे. सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी ईपीएफवर निश्चित 8.5 टक्के व्याज एकरकमी देण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. अशी शक्यता आहे की आज 31 डिसेंबर 2021 रोजी ही रक्कम 6 कोटी कर्मचाऱ्यांच्या ईपीएफ खात्यात येणार आहे. सरकारच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार अर्थ मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला (Employees Provident Fund Organisation-EPFO) 8.5 टक्के व्याज एकरकमी देण्याची मंजुरी मिळाली आहे. याच आठवड्यात या प्रस्तावावर मंजुरी मिळाली आहे. वेबसाइटच्या माध्यमातून अशाप्रकारे तपासा तुमचा बॅलन्स -Epfindia.gov.in वर लॉग इन करा -याठिकाणी तुमचा UAN क्रमांक, पासवर्ज आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा -ई-पासबुकवर क्लिक करा -याठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल (हे वाचा-2021 मध्ये अर्थव्यवस्थेत तेजीची आशा, या 5 क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगला रिटर्न) -याठिकाणी मेंबर आयडीवर क्लिक करा -अशाप्रकारे तुम्ही खात्याचील रक्कम वेबसाइटच्या माध्यमातून तपासू शकता मिसकॉल देऊन तपासता येईल तुमचा PF बॅलन्स यूएएन पोर्टलवर नोंदणीकृत सदस्यांना मिस्ड कॉल देऊन त्यांच्या खात्यातील शिल्लक जाणून घेता येईल. आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस कॉल करावा लागेल. यानंतर पीएफचा तपशील तुम्हाला ईपीएफओच्या मेसेजद्वारे प्राप्त होईल. दोन रिंगनंतर हा कॉल स्वयंचलितपणे डिस्कनेक्ट होईल. या सेवेसाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत. ईपीएफओ UAN सेवा प्रदान करते, ज्याद्वारे खातेदार त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक पाहू शकतात एसएमएसच्या माध्यमातून असा तपासा पीएफ बॅलन्स SMS च्या माध्यमातून तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. EPFOHO UAN ENG असे लिहून तुम्हाला हा मेसेज करावा लागेल. ENG म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. परंतू तुम्हाला अन्य कोणत्या भाषेत माहिती हवी असेल तर ENG ऐवजी तुम्हाला हव्या असलेल्या भाषेची पहिली तीन अक्षरं तुम्हाला टाकावी लागतील. हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलुगु, तमिळ, मलयाळम आणि बंगाली भाषेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. या क्रमांकावर मेसेज करण्यासाठी ईपीएफओ मध्ये तुमचा नंबर रजिस्टर्ड असणे अनिवार्य आहे. (हे वाचा-FASTag ची डेडलाइन 1 जानेवारीपासून पुढे वाढू शकते, वाचा काय आहे कारण) बॅलन्स तपासण्यासाठी वापरा ईपीएफओ अ‍ॅप ईपीएफओ अ‍ॅप ‘m-EPF’ डाऊनलोड करा. ते उघडल्यानंतर 'Member' वर क्लिक करा. त्यानंतर 'Balance/Passbook' ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. याठिकाणी तुमचा UAN क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर टाकून तुम्ही ईपीएफमध्ये जमा असणारी रक्कम तपासू शकता. UMANG अ‍ॅप या App च्या माध्यमातून तुमच्या ईपीएफ खात्यातील रक्कम तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरवरून वन टाइम रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर तुम्ही 'उमंग'मध्ये तुमचे ईपीएफ पासबुक पाहू शकता. त्याचप्रमाणे क्लेम देखील करू शकता आणि केलेला क्लेम ट्रॅक देखील करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Pf, PF Amount

    पुढील बातम्या