नवी दिल्ली, 06 एप्रिल: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) घर खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका दिला आहे. बँकेने गृहकर्जावरील (Home Loan) व्याजदरात वाढ केली आहे. अर्थात गृहखरेदीवर तुम्हाला आधीच्या तुलनेत जास्त ईएमआय (EMI) द्यावा लागणार आहे. बँकेचा नवा व्याजदर (SBI New Interest Rates on Home Loan) 6.95 टक्के असणार आहे. बँक 31 मार्चपर्यंत 6.70 टक्के दराने गृहकर्ज देत होती. आता यामध्ये वाढ झाल्याने कोट्यवधी ग्राहकांना बँकेन झटका दिला आहे.
एसबीआयने मर्यादित कालावधीसाठी 75 लाख रुपयांपर्यंतचे गृह कर्ज 6.70 टक्के व्याजदराने देण्याची ऑफर दिली होती. त्याचवेळी 75 लाख ते पाच कोटी रुपयांपर्यंतच्या गृह कर्जावरील व्याज दर 6.75 टक्के होते.
(हे वाचा-या सरकारी बँकेचं डेबिट कार्ड वापरत असाल तर करा हे काम, महत्त्वाची सेवा होईल बंद)
दुसऱ्या बँका देखील वाढवू शकतात व्याजदर
एसबीआयच्या वेबसाइटनुसार, 6.95 टक्के हा नवा व्याजदरा 1 एप्रिलपासून लागू होईल. नवीन दर मर्यादित अवधीच्या दराच्या तुलनेत 0.25 बेसिस पॉइंटनी जास्त आहेत. एसबीआयने गृहकर्जावरील कमीतकमी व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआय नंतर इतर बँकाही हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
(हे वाचा-Gold Price Today: 11000 रुपयांनी स्वस्त झाली सोनेखरेदी, वाचा घसरणीनंतरचा भाव)
किती असेल प्रोसेसिंग फी
बँकेने गृहकर्जावर एकीकृत प्रोसेसिंग शुल्क देखील लागू केले आहे. हे कर्जाच्या रकमेच्या 0.40 टक्के आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या स्वरूपात असेल. याशिवाय प्रक्रिया शुल्क किमान 10,000 आणि जास्तीत जास्त 30,000 रुपये (प्लस जीएसटी) असेल. गेल्या महिन्यात एसबीआयने 31 मार्चपर्यंत गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ करण्याची घोषणा केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.