Home /News /money /

Exclusive | अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या दृष्टीनेच सार्वजनिक खर्चाचं नियोजन: निर्मला सीतारामन

Exclusive | अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या दृष्टीनेच सार्वजनिक खर्चाचं नियोजन: निर्मला सीतारामन

Nirmala Sitharaman Exclusive Interview: 'अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीनेच सार्वजनिक खर्चांचं नियोजन करण्यात आलं आहे,' असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं. 2022

नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी: 'कोरोनाच्या (Coronavirus in India) दोन वर्षांच्या महासाथीतून देश नुकता सावरू लागला आहे. तसंच अनेक सकारात्मक संकेत देत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला (Indian Economy) खंबीर बळ देईल, असाच विचार बजेट तयार करताना होता. अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीनेच सार्वजनिक खर्चांचं नियोजन करण्यात आलं आहे,' असं स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman Exclusive Interview) यांनी दिलं. 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचं बजेट सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केलं. बजेटनंतर पहिल्यांदाच आज 2 फेब्रुवारी नेटवर्क 18चे राहुल जोशी (Network18 Editor-in-Chief Rahul Joshi) यांनी सीतारामन यांची Exclusive मुलाखत घेतली. या मुलाखतीत अर्थमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांचा खुलासा केला. अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक योजनांसाठीचे खर्च यांबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सध्या पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या अनुषंगाने या राज्यांसाठी कोणत्याही विशेष घोषणा या बजेटमध्ये नाहीत. त्याबद्दल विचारलं असता, सीतारामन म्हणाल्या, की 'निवडणुका येतात आणि जातात; पण सध्याच्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेला खंबीर बळ देण्याची गरज होती. त्यामुळे निवडणुकांचा विचार हे बजेट तयार करताना डोळ्यांपुढे नव्हता.' हे वाचा-Budget 2022 Exclusive: निवडणुका येत राहणार; पण आत्ता अर्थव्यवस्थेला गरज खरी गरज 'कोरोना साथीमुळे देशातल्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला. त्यामुळे अर्थव्यवस्थेची गती ढेपाळली. आता स्थिती सुधारत असल्याने आता अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलली आहेत. कल्याणकारी योजनांवरच्या खर्चात कपात करावी लागू नये, यासाठी सार्वजनिक खर्चांचं योग्य नियोजन केलं असून, निर्गुंतवणुकीचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेनं महत्त्वाची पावलं उचलली आहेत,' असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. 'गेल्या वर्षीच्या वाटपातून 65-68 टक्के कॅपेक्स वापरला गेला. ओमिक्रॉनमुळे पहिल्या तिमाहीतला खर्च दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर टाकला. दुसरी लाट आणि ओमिक्रॉन असूनही आम्हाला अपेक्षित कॅपेक्स गाठण्यात यश आलं. आता ओमिक्रॉनची लाट ओसरत असल्यानं या वर्षी अशी स्थिती उद्भवणार नाही अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत वाढ होण्याची आशा आहे,' असं त्या म्हणाल्या. 'सार्वजनिक गुंतवणूक योजनांमध्ये फक्त पायाभूत सुविधांवर भर न देता, इतर क्षेत्रांमध्येही गुंतवणुकीवर भर दिला आहे. अर्थव्यवस्था चांगली असेल, तर पायाभूत सुविधांवरच्या खर्चासाठी निधी उपलब्ध होऊ शकेल आणि अर्थव्यवस्थेवर आपोआपच चांगला परिणाम होईल. अर्थव्यवस्थेला भक्कम पाठिंब्याची गरज असल्याने असं पाऊल उचलण्यात आलं आहे,' असं सीतारामन यांनी सांगितलं. हे वाचा-Budget 2022: डिजिटल रुपया आणि डिजिटल अ‍ॅसेटसमध्ये काय फरक? काय म्हणाल्या FM? 'कोरोना साथीचा फटका बसलेल्या उद्योगांना शाश्वत पुनरुज्जीवन करण्यासाठी मदत देणं आवश्यकच आहे. तसंच अर्थव्यवस्थेची गती कायम राखण्यासाठी राज्यांना पायाभूत सुविधांवरच्या खर्चांसाठी निधी उपलब्ध करण्याकरिता मदत करण्याचीही तितकीच आवश्यकता असल्यानं आम्ही त्या बाबतीतही सातत्य राखलं. विकासाची हमी आणि सातत्य राखण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात सुरुवातीपासूनच स्पष्टता होती. त्यामुळे त्या दिशेनंच पावलं टाकण्यात आली आहेत,' असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं.
First published:

Tags: Budget, Nirmala Sitharaman, Union budget

पुढील बातम्या