नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: दरवर्षीच्या अर्थसंकल्पात (Budget 2022)त्या सुमारास जवळ आलेल्या निवडणुकीचा विचार हटकून होत असतो. राजकारण डोळ्यासमोर ठेवून ठराविक राज्यांना झुकतं माप दिलं जातं, मतदारांना खूश करण्यासाठी घोषणा केल्या जातात. आपापल्या मतदारसंघांचा विशेष विचार करणारे अर्थमंत्रीही या देशाने पाहिले आहेत. पण कुठलीही मोठी घोषणा न करणारं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं यंदाचं बजेट मात्र वेगळं दिसून आलं. काहीच बदल नाही म्हणून यावर टीका होत असली, तरी अर्थमंत्र्यांचं यावरचं भाष्य वेगळं आहे. Network18 चे राहुल जोशी यांना अर्थसंकल्पानंतर दिलेल्या Exclusive मुलाखतीत सीतारामन यांनी या सगळ्याचा खुलासा केला.
पाच राज्यांच्या निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या आहेत. त्यात उत्तर प्रदेशासारखं मोठं आणि महत्त्वाचं राज्य आहे. गेल्या वर्षी याच बजेटच्या सुमारास निवडणुका जवळ आलेल्या होत्या त्या राज्यांना मात्र झुकतं माप दिलं गेलं होतं. तेव्हाही अर्थमंत्रिपदी याच निर्मला सीतारामन होत्या. मग या वर्षी 15 दिवसांवर मतदानाचा दिवस आलेला असतानाही कुठली मोठी घोषणा कशी दिसली नाही? यावर सीतारामन म्हणाल्या, "निवडणुका येतात जातात. देशाला या क्षणाला गरज आहे ती मजबूत अर्थव्यवस्थेची."
#FMToNetwork18 | "We have placed a lot of emphasis on giving predictability and stability in the tax regime": Finance Minister Nirmala Sitharaman (@nsitharaman) on #Budget2022 #Network18Exclusive #NirmalaSitharaman pic.twitter.com/2Yvxkep7V6
— News18 (@CNNnews18) February 2, 2022
Network18 शी अर्थसंकल्पाविषयी बोलताना अर्थमंत्री म्हणाल्या, "या क्षणी महासाथ, जागतिक अर्थव्यवस्थेतले चढउतार या पार्श्वभूमीवर सर्वाधिक गरज आहे स्थैर्याची. दर वेळी मोठे बदल करूनच अर्थव्यवस्थेची उंची गाठता येते असं नाही. नेमस्त भूमिकाही उपयुक्त ठरते. आहे त्याच मार्गाने सातत्याने चालत राहिलो तर विकासदर आणि अर्थव्यवस्था चांगला वेग घेईल."
EXCLUSIVE: Tax Slab मध्ये बदल केले नाहीत कारण... अर्थमंत्र्यांनी प्रथमच केला खुलासा
कररचाना किंवा Tax Slabs मध्ये कुठलेही बदल केलेले नाहीत. कारण दर वेळी बदल केले म्हणजेच चांगलं असं म्हणून चालणार नाही. खरं तर करदात्यांना Predictability हवी असते. स्थैर्य हवं असतं. दरवर्षी छोटे-मोठे बदल करून धक्का देण्याऐवजी ही प्रेडिक्टिबिलिटी देणं हे सध्याच्या काळात आवश्यक आहे, असं निर्मला सीतारामन म्हणाल्या.
#Network18Exclusive #FMToNetwork18 India's 8% plus growth sustainable in over next few years? Finance Minister @nsitharaman responds to Network18 group editor @18RahulJoshi, she says, 'If all sectors come up and are on their toes, it is achievable.' pic.twitter.com/8552DuTztX
— News18 (@CNNnews18) February 2, 2022
भारताचा अर्थसंकल्प स्वातंत्र्यानंतर केवळ तुटीचाच मांडत आला आहे. साधारणपणे जगभरातील देश फक्त तुटीचेच बजेट सादर करतात. जगात असे फार कमी देश आहेत, ज्यांचे बजेट तुटीपेक्षा नफ्याचे असते. भारताच्या 2022-23 च्या अर्थसंकल्पात, महसुली तूट GDP च्या 6.4% असण्याचा अंदाज आहे. 2021-22 मध्ये सुधारित महसुली तूट जीडीपीच्या 6.9% इतकी नोंदवली गेली आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Budget, Economy, Network18, Nirmala Sitharaman, Union Finance Minister