Home /News /money /

Budget 2022: डिजिटल रुपया आणि डिजिटल अ‍ॅसेटसमध्ये काय फरक? काय म्हणाल्या अर्थमंत्री?

Budget 2022: डिजिटल रुपया आणि डिजिटल अ‍ॅसेटसमध्ये काय फरक? काय म्हणाल्या अर्थमंत्री?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी (1 फेब्रुवारी 22) सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Union Budget 2022) देशाचे स्वतःचे डिजिटल चलन (Digital Currency) सुरू करण्याच्या सरकारच्या योजनेची घोषणा केली.

मुंबई, 02 फेब्रुवारी: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी (1 फेब्रुवारी 22) सादर केलेल्या अर्थसंकल्पात (Union Budget 2022) देशाचे स्वतःचे डिजिटल चलन (Digital Currency) सुरू करण्याच्या सरकारच्या योजनेची घोषणा केली. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) यंदा 2022मध्येच हे डिजिटल चलन दाखल करणार असल्याचं सीतारामन यांनी यावेळी स्पष्ट केलं. या अर्थसंकल्पात त्यांनी डिजिटल अ‍ॅसेट्सवरील करआकारणीचीही घोषणा केली तसंच डिजिटल चलन आणि डिजिटल अ‍ॅसेट्स यांच्यातील फरकही स्पष्ट केला. डिजिटल चलन आणि डिजिटल अ‍ॅसेट्सबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमज आहेत, त्याबाबतही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सविस्तर खुलासा केला. डिजिटल रुपया आणि डिजिटल अ‍ॅसेट्समध्ये काय फरक आहे? एखादं चलन देशाच्या मध्यवर्ती बँकेद्वारे जारी केलं जातं तेव्हाच ते त्या देशाचे अधिकृत चलन मानले जाते. जे चलन मध्यवर्ती बँकेने जारी केलेलं नसेल तर ते देशाचं अधिकृत चलन ठरत नाही. क्रिप्टोकरन्सी हे डिजिटल चलन मध्यवर्ती बँकेनं जारी केलेलं नाही. त्याला डिजिटल अ‍ॅसेट्स म्हणता येईल. हे वाचा-या शेअरने दिला 800% रिटर्न, 1 लाखाचे केले 9.25 लाख; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक? यावर कर आकारणीचे नियम काय आहेत? सर्व प्रथम, हे लक्षात घेतलं पाहिजे की अद्याप जारी न केलेल्या चलनासाठी कोणत्याही प्रकारच्या कर आकारणीचे नियम तयार करण्यात आलेले नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँक हे डिजिटल चलन जारी करणार आहे. याव्यतिरिक्त असलेल्या डिजिटल चलनातून निर्माण झालेले अ‍ॅसेट्स हे डिजिटल अ‍ॅसेट्स ठरतील. अशा अ‍ॅसेट्सच्या व्यवहारातून मिळणाऱ्या नफ्यावर 30 टक्के कर आकारला जाईल. याशिवाय प्रत्येक व्यवहारावर 1 टक्के टीडीएस (TDS) कपात करदेखील लागू होईल. डिजिटल रुपया म्हणजे काय? जगभरात क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल चलन लोकप्रिय होत आहे. गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर याचा विस्तार झाला आहे. खासगी व्हर्च्युअल चलन एखाद्या व्यक्तीचे कर्ज किंवा दायित्व दर्शवत नाहीत कारण त्याचा अधिकृत जारीकर्ता नाही. हे पैसेही (Money) नाहीत आणि अधिकृत चलनही नाही. पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच एक एप्रिलपासून भारताचे स्वतःचे अधिकृत डिजिटल चलन अस्तित्वात येईल. सध्याच्या भौतिक स्वरूपातील चलनाचे हे डिजिटल स्वरूप असेल. हे वाचा-कमी नाही होणार Gold Rate; सरकारच्या या निर्णयामुळे सामान्यांची निराशा सेंट्रल बँक डिजिटल करन्सीबाबतच्या (CBDC) नियमांना अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेलं नाही. हे देखील डिजिटल किंवा व्हर्च्युअल अर्थात आभासी चलन आहे. परंतु त्याची तुलना खासगी आभासी चलन किंवा क्रिप्टोकरन्सीशी होऊ शकत नाही. भारतीय रिझर्व्ह बँक सुरुवातीपासूनच खासगी क्रिप्टोकरन्सीच्या विरोधात असून, देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी हे धोकादायक आहेत, असा सरकारचा विश्वास आहे.
First published:

Tags: Budget, Union budget

पुढील बातम्या