नवी दिल्ली, 05 जुलै : बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही एफडी (FD Fixed Deposit) केली असेल तर तुम्हाला 15G आणि 15H फॉर्म जमा (TDS) करणे अनिवार्य आहे. नाहीतर तुम्हाला व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नातून टीडीएस कापून घेतला जाईल. हा फॉर्म जमा करण्याची शेवटची तारीख 7 जुलै अशी होती, मात्र आता ही तारीख वाढवून सरकारने 31 जुलै 2020 (FY 2019-20) केली आहे. म्हणजेच 31 जुलैपर्यंत तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर कोणताही टीडीएस कापला जाणार नाही.
हे दोन्ही फॉर्म करापासून वाचण्यासाठी असे करदाता भरतात जे टॅक्स स्लॅबमध्ये येत नाहीत. केंद्र सरकारने लॉकडाऊनमुळे लोकांसमोर निर्माण झालेल्या विविध समस्यां लक्षात घेता बँकेच्या ठेवीदारांना देखील दिलासा दिला आहे. ठेवीदारांना एफडीवर देय व्याजदरावरील टीडीएसवर सूट मिळावी याकरता 15जी फॉर्म आणि 15एच फॉर्म भरावा लागतो.
(हे वाचा-मोदी सरकारकडून स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! घेऊ शकता या योजनेचा लाभ)
आयकर विभागाने हा फॉर्म भरण्याची मुदत 31 जुलै पर्यंत वाढवली आहे. जर ठेवीदारांनी हा फॉर्म नाही भरला तर बँकेकडून मिळणाऱ्या व्याजाच्या नफ्यावर 10 टक्के टीडीएस कापण्यात येतो. कोरोना व्हायरसच्या संकटाची परिस्ठिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
Understanding the current times that we are in, we have further extended deadlines. Now, furnishing of TDS/TCS statements for FY 19-20 extended to 31st Jul, 2020 & issuance of TDS/TCS certificates for FY 19-20 extended to 15th Aug, 2020.#ITDateExtension#FacilitationDuringCovid pic.twitter.com/t8VrtYqhDu
— Income Tax India (@IncomeTaxIndia) July 3, 2020
कुणाला भरावा लागेल हा फॉर्म?
फॉर्म 15G चा वापर 60 वर्षापेक्षा कमी वय असणारा भारतीय नागरिक, हिंदू अविभाजित परिवार म्हणजेच HUF किंवा ट्रस्ट करू शकतात. तर फॉर्म 15H ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणजेच 60 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी असतो. या फॉर्म्सची वैधता केवळ 1 वर्ष असते. त्यामुळे प्रत्येक वर्षी ते जमा करणे आवश्यक असते.
फॉर्म भरण्याची आवश्यकता
आर्थिक वर्षामध्ये एफडीवरील व्याजामुळे मिळणारे उत्पन्न एक निश्चित सीमा पार करते, त्यावेळी बँकांना टीडीएस करणे अनिवार्य असते. त्यामुळे ठेवीदारांनी 15जी फॉर्म आणि 15एच फॉर्म (वरिष्ठ नागरिकांसाठी) एक प्रकारे स्वघोषणा पत्र असते आणि त्यात असे भरावे लागते की त्यांचे उत्पन्न करयोग्य सीमेपेक्षा कमी आहे.
(हे वाचा-मोठी बातमी! मुंबईतील ऑफिस कायमचे बंद करणार ही नामांकित कंपनी- सूत्र)
या खातेधारकांच्या उत्पन्नावर टीडीएस नाही कापता येणार हे सुनिश्तित करण्यासाठी 15जी फॉर्म आणि 15एच फॉर्म (वरिष्ठ नागरिकांसाठी) भरणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही व्याजावरील टीडीएसपासून वाचू शकता. हा फॉार्म बँका, कॉर्पोरेट बाँड जारी करणाऱ्या कंपन्या, पोस्ट ऑफिस इ. मध्ये द्यावा लागतो.
जर कर कापला गेला तर कसे मिळवाल पैसे परत?
फॉर्म 15G आणि फॉर्म 15H भरण्यास उशीर झाल्यामुळे टीडीएस कापला गेल्यास, त्याचा रिफंड केवळ इनकम टॅक्स रिफंड फाइल करूनच मिळवू शकता.
SBI मध्ये एफडी असणारे घरबसल्या हा फॉर्म कसा जमा करू शकतात?
ग्राहकांना ई-सेवा, 15G/H हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर 15एच किंवा 15जी पैकी तुमचा फॉर्म निवडा. त्यानंतर Customer Information File (CIF) No वर क्लिक करून सबमिट करा.
(हे वाचा-नोकरी जाण्याची भीती असल्यास सुरू करा हा व्यवसाय, करू शकता लाखोंची कमाई)
सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एका पेजवर रिडायरेक्ट केले जाईल. ज्याठिकाणी काही माहिती अगोदरच भरलेली असेल. त्यानंतर अन्य माहिती भरा.
संपादन - जान्हवी भाटकर