नोकरी जाण्याची भीती असल्यास सुरू करा हा व्यवसाय, करू शकता लाखोंची कमाई

नोकरी जाण्याची भीती असल्यास सुरू करा हा व्यवसाय, करू शकता लाखोंची कमाई

कोरोनाच्या संकटकाळात नोकरीची संधी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. अशावेळी अनेकांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या कल्पनेवर विचार करण्यास सुरुवात केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 जुलै : कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) देशामध्ये थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अशावेळी या संकटकाळात नोकरीची संधी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. अशावेळी अनेकांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या कल्पनेवर विचार करण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी कुणी नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असेल पण शिक्षणाच्या कमतरतेमुळे व्यवसायाची गाडी पुढे सरकत नसेल तर अशावेळी एक व्यवसाय फायद्याचा ठरू शकेल. हा व्यवसाय म्हणजे जैविक शेतीचा!

सरकारी नोकरीची तयारी तयारी करणाऱ्या योगेश यांनी शेती व्यवसायाची निवड केली आणि 7 शेतकऱ्यांच्या मदतीने त्याने जिऱ्याची जैविक शेती (Organic Farming) सुरू केली. आज त्यांचा हा प्रवास 3000 शेतकऱ्यांना बरोबर घेत जपान आणि थेट अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचला आहे. योगेशमध्ये शेतीविषयी आवड त्याचे शिक्षण सुरु असताना निर्माण झाली. पदवी घेतल्यानंतर त्यांनी ऑर्गेनिक फार्मिंगमध्ये डिप्लोमा देखील केला. याचा परिणाम असा झाला की त्याची शेतीमधील रूची अधिक वाढू लागली. त्यावेळी त्याला थेट शेती करण्याऐवजी अॅग्रीकल्चर सुपरव्हायजर बनण्याचा सल्ला देखील देण्यात आला होता. राजस्थानमधील युवा शेतकरी योगेश जोशी यांची ही कहाणी आहे.

अशी झाली व्यवसायाची सुरूवात

(हे वाचा-SBI अलर्ट! ATMमधून पैसे काढण्याच्या नियमात बदल, माहित नसल्यास भरावा लागेल दंड)

सुरुवातीला योगेश यांनी याचा विचार केला की, शेती क्षेत्रात कोणते पीक घेतल्यास त्याचा अधिक फायदा होईल त्याचप्रमाणे त्या पिकाची बाजार मागणी देखील जास्त असेल. त्यावेळी त्याला माहित झालं की जिऱ्याच्या शेतीतून जास्त उत्पन्न मिळते. त्याने सुरुवातीला 2 एकर शेतामध्ये उत्पन्न घेतले पण त्यामध्ये त्यांना अपयश आले. मात्र ते हिम्मत हरले नाहीत. आज त्याचा टर्नओव्हर 60 कोटींचा आहे.

(हे वाचा-FD पेक्षा जास्त नफा देणारी सरकारची नवी योजना, दर सहा महिन्यांनी होणार फायदा)

7 शेतकऱ्यांबरोबर सुरू झालेल्या व्यवसायाने आज मोठा आकार घेतला आहे. योगेश यांच्याबरोबर आता 3000 पेक्षा जास्त शेतकरी जोडले गेले आहेत. 2009 मध्ये त्यांचा टर्नओव्हर 10 लाख रुपये होता. त्यांची फर्म रपिड ऑर्गेनिक प्रा. लि. (अन्य 2 सहयोगी कंपन्यांसहित)चा वार्षिक टर्नओव्हर 60 कोटींपेक्षाही जास्त आहे. आज हे सर्व शेतकरी जैविक शेतीला प्राध्यान्य देऊन केमिकल फ्री शेती व्यवसाय करण्याच्या त्यांचा मानस आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

 

First published: July 2, 2020, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading