Home /News /money /

मोठी बातमी! मुंबईतील ऑफिस कायमचे बंद करणार ही नामांकित कंपनी- सूत्र

मोठी बातमी! मुंबईतील ऑफिस कायमचे बंद करणार ही नामांकित कंपनी- सूत्र

देशभरात कोरोनाचे (Coronavirus)संक्रमण रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही कंपन्यानी त्यांची कार्यालये भाड्याने दिली आहेत तर काहींनी ती विकली आहेत.

    मुंबई, 04 जुलै : देशभरात कोरोनाचे (Coronavirus)संक्रमण रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही कंपन्यानी त्यांची कार्यालये भाड्याने दिली आहेत तर काहींनी ती विकली आहेत. CNBCTV18 ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार App वर आधारित टॅक्सी सेवा देणारी अमेरिकन मालकीची कंपनी उबर (UBER) ने त्यांचे मुंबईतील ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये फूड डिलिव्हरी कंपनी, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कंपन्या आणि मध्यम स्तरावर असणाऱ्या स्टार्टअप्सने त्यांची कार्यालये बंद केली आहेत किंवा भाड्याने दिली आहेत. कंपनीचे अधिकारी आणि इस्टेट डेव्हलपर्सच्या मते कंपन्या त्यांचे भाडे सरासरी एक तृतीयांश कमी व्हावे अशी मागणी करत आहे. (हे वाचा-मोदी सरकारच्या या योजनेमुळे 20.41 लाख जणांना मिळणार वार्षिक 36 हजार रुपये) खर्च कमी करण्यासाठी उबरकडून याआधी कर्मचाऱ्यांना काढण्यात आले आहे कोरोना व्हायरस (COVID-19) च्या या संकटकाळात UBER ने त्यांच्या 14 टक्के अर्थात 3700 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. गेल्या महिन्यात उबरने या कर्मचाऱ्यांना झूम (Zoom) व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून असे सांगितले होते की, कोव्हिड-19 पँडेमिक एक मोठे आवाहन बनले आहे, त्यामुळे त्यापासून वाचण्यासाठी उबर कर्मचाऱ्यांना असे सांगण्यात येत आहे की आता कंपनीला तुमची आवश्यकता नाही आहे. (हे वाचा-बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये FD आहे? 3 दिवसात हा फॉर्म जमा न केल्यास होणार नुकसान) उबरचे चालू कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच जानेवारी ते मार्चमधये 2.9 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. कंपनीचे या पहिल्या तिमाहीमध्ये उत्पन्न 3.54 अब्ज डॉलर इतके होते. गेल्या वर्षीच्या समान कालावधीपेक्षा ते 14 टक्क्यांनी कमी आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    First published:

    Tags: Uber

    पुढील बातम्या