• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • SBI-PNB सह या बँका देत आहेत कमाईची संधी, केवळ 14 दिवसांत मिळवा नफा

SBI-PNB सह या बँका देत आहेत कमाईची संधी, केवळ 14 दिवसांत मिळवा नफा

Fixed Deposit: स्टेट बँक ऑफ इंडिया ते पीएनबी, आयसीआयसीआय आणि एचडीएफसीसह तुम्ही ही एफडी करू शकता. जाणून घ्या एफडीवर तुम्हाला किती व्याज मिळेल.

  • Share this:
    नवी दिल्ली, 10 सप्टेंबर: तुम्हाला देखील 7 ते 14 दिवसात चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर सरकारीसह खाजगी बँका तुम्हाला ही संधी देत आहे. तुम्ही बँक एफडीमध्ये (Bank Fixed Deposit) 7 ते 14 दिवसांसाठी गुंतवणूक करून चांगला फायदा मिळवू शकता. या कालावधीसाठी विविध बँकांमध्ये एफडीवरील व्याजदर वेगवेगळा आहे. जाणून घ्या या कमी कालावधीच्या एफडीवर तुम्हाला किती व्याजदर मिळेल... 1. स्टेट बँक ऑफ इंडिया- देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया 7 दिवसांच्या एफडीसाठी 2.90 टक्के दराने व्याजदर देत आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना या कालावधीसाठी SBI 3.40 दराने व्याज देत आहे. 2. बँक ऑफ बडोदा- BoB मध्ये 7 दिवसांच्या एफडीवर 2.80 टक्के दराने व्याजदर मिळतो आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.30 टक्के आहे 3. आयसीआयसीआय बँक- ICICI Bank त्यांच्या ग्राहकांना 7 ते 14 दिवसांच्या एफडीसाठी 2.50 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 2.50 दराने एफडीवर व्याज देत आहे. 4. एचडीएफसी बँक- HDFC Bank त्यांच्या ग्राहकांना 7 ते 14 दिवसांच्या एफडीसाठी 2.50 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 3.00 टक्के दराने एफडीवर व्याज देत आहे. हे वाचा-Petrol Price Today: गणेश चतुर्थीच्या दिवशी काय आहे पेट्रोल-डिझेल दर,इथे तपासा दर 5. बँक ऑफ इंडिया- BOI मध्ये 7 दिवसांच्या एफडीवर 03.00 टक्के दराने व्याजदर मिळतो आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.50 टक्के आहे 6. पीएनबी आणि पंजाब अँड सिंध बँक- PNB आणि पंजाब अँड सिंध बँकेमध्ये सामान्य नागरिकांसाठी 3 टक्के दराने एफडीवर व्याज मिळते आहे. या दोन्ही बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50 टक्के दराने FD वर व्याज मिळते आहे. 7. यूनियन बँक ऑफ इंडिया- या बँकेत 7 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3 टक्के दराने व्याज मिळते आहे. 8. बंधन बँक- बंधन बँकेत 7 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3 टक्के दराने व्याज मिळते आहे. तर याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के दराने व्याज मिळते आहे. 9. येस बँक- YES बँकेत 7 दिवसांच्या एफडीवर सामान्य नागरिकांना 3.25 टक्के दराने व्याज मिळते आहे. तर याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना 3.75 टक्के दराने व्याज मिळते आहे. हे वाचा-बाप्पाच्या आगमनादिवशी स्वस्त झालं सोनं, 500 रुपयांनी उतरले भाव; काय आहेत आजचे दर 10. डीसीबी बँक- डीसीबी बँकेत सात दिवसांच्या एफडीवर 4.55 टक्के दराने व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी याठिकाणी 5.05 टक्के दराने व्याज मिळते आहे. 11. इंडियन ओव्हरसीज बँक- याशिवाय इंडियन ओव्हरसीज बँकेत सात दिवसांच्या एफडीवर 3.40 दराने व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी याठिकाणी 3.90 टक्के दराने व्याज मिळते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: