• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol Price Today: गणेश चतुर्थीच्या दिवशी काय आहे पेट्रोल-डिझेल दर, इथे तपासा लेटेस्ट रेट

Petrol Price Today: गणेश चतुर्थीच्या दिवशी काय आहे पेट्रोल-डिझेल दर, इथे तपासा लेटेस्ट रेट

Petrol and Diesel Price Today

Petrol and Diesel Price Today

आज 10 सप्टेंबर 2021 गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशी पेट्रोल-डिझेल दरात (Petrol Diesel Price) कोणतेही बदल केलेले नाहीत. आज सलग पाचव्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : सरकारी तेल कंपन्यांनी आज 10 सप्टेंबर 2021 गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi) दिवशी पेट्रोल-डिझेल दरात (Petrol Diesel Price) कोणतेही बदल केलेले नाहीत. आज सलग पाचव्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. रविवारी देशातील विविध शहरांत 10 पैशांपासून 15 पैशांपर्यंत पेट्रोल दरात कपात करण्यात आली होती. पेट्रोल - डिझेल भाव (Petrol Diesel Price on 10 September 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 88.62 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये आणि डिझेल 96.19 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 98.96 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 101.72 रुपये आणि डिझेल 91.84 रुपये प्रति लीटर >> नोएडात पेट्रोल 98.52 रुपये आणि डिझेल 89.21 रुपये प्रति लीटर >> जयपुरमध्ये पेट्रोल 108.17 रुपये आणि डिझेल 97.76 रुपये प्रति लीटर >> भोपाळमध्ये पेट्रोल 109.63 रुपये आणि डिझेल 97.43 रुपये प्रति लीटर IOCL कडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले जातात. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा SMS द्वारे आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता.

    Income Tax Return भरण्याची तारीख पुन्हा वाढवली, या दिवसापर्यंत मिळणार मुदतवाढ

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published: