जाहिरात
मराठी बातम्या / मनी / वर्षभराची FD करायची गरज नाही, 30-40 दिवसांतही होते कमाई; कशी करायची गुंतवणूक?

वर्षभराची FD करायची गरज नाही, 30-40 दिवसांतही होते कमाई; कशी करायची गुंतवणूक?

फिक्स्ड डिपॉझिट रेट

फिक्स्ड डिपॉझिट रेट

एफडी हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम ऑप्शन मानला जातो. पण अनेकदा वर्षभर पैसे अडकण्याचा विचार करून लोक एफडी करत नाहीत. मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही फक्त 30 ते 40 दिवसात चांगले पैसे कमवू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 मे : बँकांमधील एफडीवर लोकांना खूप जास्त विश्वास आहे. अशा वेळी तुम्ही अशा बँकेच्या शोधात असाल, जिथे तुम्हाला चांगला रिटर्न मिळू शकेल आणि तुमचे पैसेही जास्त काळ लॉक होत नाहीत, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची  आहे. अनेक बँकांनी आता बँक एफडीचे दर वाढवले ​​आहेत. आता ग्राहकांना एफडीवर 7 टक्क्यांहून अधिक व्याजाचा लाभ मिळणार आहे. बँकांकडे 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडी स्किम आहेत. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकतात. बँकेत एफडी करण्यासाठी, ग्राहक बँकेच्या शाखांना भेट देऊ शकतो किंवा इंटरनेट बँकिंग किंवा मोबाइल अॅपवर लॉग इन करू शकतो. याशिवाय ग्राहकांना मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी रिलेशनशिप मॅनेजरही उपलब्ध असतील. चला तर मग जाणून घेऊया बँकांचे रेट्स…

News18लोकमत
News18लोकमत

SBI मध्ये फिक्स्ड डिपॉझिट दर

ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या वेगवेगळ्या मुदतींच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 3% ते 7.10% पर्यंत व्याज देत आहे. 7 ते 45 दिवसांच्या FD वर 3% व्याज मिळेल.

Punjab National Bank मध्ये फिक्स्ड डिपॉझिट दर

7 ते 14 दिवस - 3.5% 15 ते 29 दिवस - 3.5% 30 ते 45 दिवस - 3.5%

दिवसभर चालेल AC तरीही झिरो येईल वीज बिल, फक्त करा हे छोटंस काम

Bank of Baroda मध्ये फिक्स्ड डिपॉझिट रेट

या बँकेने नुकतंच 2 वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरांमध्येही बदल केले आहे. या बदलानंतर, ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक आता सर्वाधिक 7.25% पर्यंत व्याज देत आहे. 7 ते 14 दिवस - 3% 15 ते 45 दिवस - 3%

HDFC मध्ये फिक्स्ड डिपॉझिट रेट

प्रायव्हेट सेक्टरच्या टॉप बँकांमध्ये असणारी एचडीएफसी बँक फिक्स्ड डिपॉझिटवर 3% ते 7.10% पर्यंत व्याज देत आहे. 7 ते 14 दिवस - 3% 15 ते 29 दिवस - 3% 30 ते 45 दिवस - 3.50%

जबरदस्त FD ऑफर! ही बँक फिक्स डिपॉझिटवर देते 8.85 टक्के व्याजदर

कोटक महिंद्रा बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट रेट

या बँकेने नुकतेच 1 वर्षाच्या FD वरील व्याजदरात 50 बेस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. या बँकेत सामान्य नागरिकांना 2.75% ते 7.20% पर्यंत व्याज मिळतय. 7 ते 14 दिवस - 2.75% 15 ते 30 दिवस - 3% 31 ते 45 दिवस - 3.25%

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात