सोलर एसी सौर पॅनेलद्वारे सूर्यप्रकाशापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर काम करतात. यामुळे तुम्हाला वीज बिलातून दिलासा मिळेल. तसं पाहिलं तर रेग्यूलर एसी चालवण्यासाठी खूप जास्त वीज खर्च होते. एवढंच नाही तर त्याचा मेंटेनेंस खर्च देखील खूप जास्त आहे.
सोलर एसी बसवण्याचे अनेक फायदे आहेत. यात एसी पॉवर वापरत नाही, त्यामुळे तुमची वीज बिलातून सुटका होते. तर, तुम्हाला नेहमीच्या एसीमध्ये मिळणारी सर्व वैशिष्ट्ये जसे की ऑटो स्टार्ट मोड, टर्बो कूल मोड, ड्राय मोड, स्लीप मोड, ऑन-ऑफ टायमर, ऑटो क्लीन, स्पीड सेटिंग, लव्हर स्टेप अॅडजस्ट आणि रिमोटवरील ग्लो बटण सर्वच मिळतं.