मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ज्येष्ठ नागरिकांसाठी Fixed Deposit चा पर्याय फायद्याचा, Google Pay वर देखील काढता येईल FD

ज्येष्ठ नागरिकांसाठी Fixed Deposit चा पर्याय फायद्याचा, Google Pay वर देखील काढता येईल FD

एफडीवर मिळणारा कमी व्याजदर आणि वाढती महागाई अशी विषम स्थिती असल्यानं FD मधील गुंतवणूक कमी झाली आहे. परंतु, असे असले तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा गुंतवणूकीचा एक महत्वाचा पर्याय आहे.

एफडीवर मिळणारा कमी व्याजदर आणि वाढती महागाई अशी विषम स्थिती असल्यानं FD मधील गुंतवणूक कमी झाली आहे. परंतु, असे असले तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा गुंतवणूकीचा एक महत्वाचा पर्याय आहे.

एफडीवर मिळणारा कमी व्याजदर आणि वाढती महागाई अशी विषम स्थिती असल्यानं FD मधील गुंतवणूक कमी झाली आहे. परंतु, असे असले तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी हा गुंतवणूकीचा एक महत्वाचा पर्याय आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली :  सध्या कोरोनामुळे (Corona) एकूणच अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अनेक बॅंका (Bank) किंवा वित्तीय संस्थांनी फिक्स्ड डिपॉझिटवरील (Fixed Deposit) व्याजदरात (Interest Rate)  कपात केली आहे. सेवानिवृत्तीनंतर मिळालेली रकमेची एफडी करुन त्यावर मिळणाऱ्या व्याजाच्या आधारे आपला मासिक खर्च भागवायचा असं साधारण गणित ज्येष्ठ नागरिकांचं असतं. परंतु, गेल्या काही कालावधीपासून अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने एफडीवरील (FD) व्याजदरात लक्षणीय घट झाल्याची पाहायला मिळत नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) बॅंका काही प्रमाणात अधिक व्याज एफडीवर देतात. परंतु, सध्याचे व्याजदर अगदीच नाममात्र असे म्हणता येतील. या व्याजावर मासिक खर्च भागवण्यासाठी अनेक ज्य़ेष्ठ नागरिकांना कसरत करावी लागत आहे. ही स्थिती पाहता काही बॅंकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष एफडी योजना (Special FD Scheme) सादर केल्या आहेत. तसेच गुगल पेच्या (Google Pay) माध्यमातूनही एफडी करणं आता शक्य होणार आहे. याबाबतचं सविस्तर वृत्त जनसत्ताने दिलं आहे. हे वाचा-केंद्र सरकारच्या 'या' मोठ्या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना मिळू शकतो रोजगार एफडीवर मिळणारा कमी व्याजदर आणि वाढती महागाई अशी विषम स्थिती असल्यानं FD मधील गुंतवणूक कमी झाली आहे. परंतु, असे असले तरी खासकरुन ज्येष्ठ नागरिकांसाठी हा गुंतवणूकीचा एक महत्वाचा पर्याय आहे. त्यातच आता एफडी करु इच्छिणाऱ्यांसाठी गुगल पे App ही महत्वाची भूमिका बजावणार आहे. आता गुगल पे च्या माध्यमातून ग्राहक एफडी करु शकणार आहेत. खरं तर यात गुगल पेची स्वतःची अशी कोणतीही स्कीम नाही. बॅंकांच्या स्कीम्सची विक्री गुगल पे करणार आहे. गुगल पेने यासाठी फिनटेक कंपनीशी करार केला आहे. यात सर्व प्रथम इक्विटास स्मॉल फायनान्स बॅंकेत एफडी करण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. या बँकेची एफडी योजना 1 वर्षांसाठी असेल. यात कमाल 6.35 टक्के व्याज मिळेल. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बॅंकेच्या संयुक्त विद्यमाने ही योजना चालणार आहे. कोरोनाकाळात अनेक बॅंकानी ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल एफडी योजना सुरु केल्या होत्या. ज्या नागरिकांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा नागरिकांना या बॅंका प्रचलित व्याजदराच्या तुलनेत अधिक दर देत आहेत. बॅंक ऑफ बडोदा, एचडीएफसी बॅंक आणि एसबीआयची ही स्पेशल स्किम 30 सप्टेंबर 2021 पर्यंत सुरु असेल. तसेच आयसीआयसीआय बॅंकेने जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या गोल्डन इयर्स एफडी योजनाचा कालावधीही वाढवला आहे. हे वाचा-परभणीमध्ये पेट्रोलचे भाव 110 रुपयांपार, याठिकाणी का असतो सर्वाधिक दर? एचडीएफसी (HDFC) ओल्ड सिटीझन केअर ही एचडीएफसी बॅंकेची ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष एफडी योजना आहे. या योजनेंतर्गत बॅंक एफडीवर 75 बेसिक पॉईंट म्हणजेच 0.75 टक्के व्याज अधिक देते. एचडीएफसी बॅंक या योजनेतून ज्य़ेष्ठ नागरिकांनी एफडी केल्यास त्यांना एफडीवर 6.25 टक्के व्याजदर दिला जात आहे. आयसीआयसीआय बॅंकेने (ICICI Bank) 7 ऑक्टोबर 2021 पर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी आपली गोल्डन इयर विशेष एफडी योजनेला मुदतवाढ दिली आहे. या योजनेतून 80 बेसिक पॉईंटस म्हणजेच 0.80 टक्के अधिक व्याज दर ज्येष्ठ नागरिकांना प्रचलित व्याजदराच्या तुलनेत मिळतो. या योजनेतून एफडी केल्यास जेष्ठ नागरिकांना एफडीवर 6.30 टक्के व्याज दर मिळत आहे. बॅंक ऑफ बडोदामध्ये (Bank Of Baroda) ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 100 बेसिक पॉईंटस म्हणजे 1 टक्का व्याजदर अधिक मिळतो. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने स्पेशल एफडी प्लॅन म्हणजेच 5 वर्षांपेक्षा अधिक आणि 10 वर्ष कालावधीसाठी रक्कम फिक्स्ड डिपॉझिट केली तर त्यांना 6.25 टक्के व्याज दर मिळतो. हे वाचा-PNB मध्ये FD करण्याचा विचार करताय? जाणून घ्या Fixed Deposit नवे व्याजदर 60 वर्षे वयावरील जेष्ठ नागरिकांसाठी एसबीआयची (SBI) वुई केअर ही विशेष एफडी स्कीम असून, ती 5 वर्षाच्या कालावधीकरिता आहे. या योजनेंतर्गत नेहमीच्या एफडीच्या तुलनेत अतिरिक्त 30 पॉईंटसची सूट म्हणजेच 0.30 टक्के व्याजदर अधिक दिला जातो. एसबीआयच्या या विशेष एफडी योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 6.20 टक्के व्याजदर दिला जात आहे.
First published:

Tags: Fixed Deposit, Sbi fd rates

पुढील बातम्या