मराठी बातम्या /बातम्या /देश /क्या बात है! केंद्र सरकारच्या 'या' मोठ्या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना मिळू शकतो रोजगार; प्रस्तावाला दिली मंजुरी

क्या बात है! केंद्र सरकारच्या 'या' मोठ्या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना मिळू शकतो रोजगार; प्रस्तावाला दिली मंजुरी

याचा थेट फायदा रोजगाराच्या संधी (Employment opportunities) उप्लब्ध करून देण्यात होणार आहे.

याचा थेट फायदा रोजगाराच्या संधी (Employment opportunities) उप्लब्ध करून देण्यात होणार आहे.

याचा थेट फायदा रोजगाराच्या संधी (Employment opportunities) उप्लब्ध करून देण्यात होणार आहे.

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट: केंद्र सरकार गेल्या काही काळापासून रोजगार वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे.त्यामुळे या संबंधीचे निर्णयही घेतले जात आहेत. पायाभूत क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक (FDI) आणण्याबाबत केंद्र सरकारनं आज मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीनं (CCEA) कॅनडाच्या (Canada) पेन्शन फंडसोबत संलग्न असलेल्या अँकोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेडच्या (Anchorage Infrastructure Investment Holding Limited) तब्बल 15,000 कोटी रुपयांच्या FDI (Foreign Direct Investment) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याचा थेट फायदा रोजगाराच्या संधी (Employment opportunities) उप्लब्ध करून देण्यात होणार आहे.

ही रकम थेट विकासकामांसाठी वापरता येऊ शकते. मोदी सरकार ही रक्कम वाहतूक आणि रसद तसेच विमानतळाशी संबंधित सेवा आणि विमान वाहतूक संबंधित व्यवसाय आणि सेवांसाठी वापरू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात या क्षेत्रांमध्ये नवनवीन जॉब्सच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

हे वाचा - सरकारी बँकेतील कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास कुटुंबाला मिळणार 30 टक्के अधिक पेन्शन

या गुंतवणुकीत बेंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट (Bangalore International Airport) लिमिटेडमधील हिस्सा अँकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेडला हस्तांतरित करणं समाविष्ट आहे. याशिवाय, ओंटारियो इन्कॉर्पोरेशनने 950 कोटी रुपयांची गुंतवणूक अँकोरेज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देखील केली आहे. ही कॅनडामधील सर्वात मोठी फिक्स्ड बेनिफिट पेन्शन योजना आहे. ही गुंतवणूक विमानतळ क्षेत्रासह पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्राला चालना देईल. यामुळे जागतिक दर्जाची विमानतळं आणि वाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या सरकारच्या योजना पूर्ण करण्यात मदत होईल. जागतिक दर्जाची विमानतळं आणि सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.

अँकोरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेड नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन (एनएमपी) अंतर्गत काही मालमत्तेशी निगडित क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव आहे. अधिकृत निवेदनानुसार गुंतवणुकीतून रोजगारही निर्माण होईल. खरं म्हणजे या कंपनीनं ज्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे त्या क्षेत्रांमध्ये जॉब्स आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

First published:
top videos

    Tags: Central government, Investment, Modi government