जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Petrol Price Today: परभणीमध्ये पेट्रोलचे भाव 110 रुपयांपार, याठिकाणी का असतो सर्वाधिक दर?

Petrol Price Today: परभणीमध्ये पेट्रोलचे भाव 110 रुपयांपार, याठिकाणी का असतो सर्वाधिक दर?

परभणी याठिकाणी, जिथे राज्यातील सर्वात महाग पेट्रोल मिळते त्याठिकाणी आज पेट्रोलचे दर वधारले आहेत. परभणीमध्ये पेट्रोलची किंमत (Petrol Price Today in Parbhani) 39 पैशांनी वधारली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

परभणी, 26 ऑगस्ट: सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Today) कोणतीही वाढ केलेली नाही. देशातील मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर मंगळवार इतकेच आहेत. मात्र राज्यातील काही शहरात आज पेट्रोलच्या किंमतीत बदल झाले आहेत. विशेषत: परभणी याठिकाणी, जिथे राज्यातील सर्वात महाग पेट्रोल मिळते त्याठिकाणी आज पेट्रोलचे दर वधारले आहेत. परभणीमध्ये पेट्रोलची किंमत (Petrol Price Today in Parbhani) 39 पैशांनी वधारली आहे. त्यामुळे परभणीमध्ये दर 110.05 रुपये प्रति लीटर झाले आहेत. तर याठिकाणी डिझेलचे (Diesel Price Today in Parbhani) दर देखील 38 पैशांनी वाढून 97.45 रुपये प्रति लीटर झाले आहेत. परभणीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दर शंभरीपारच आहेत. या वाढलेल्या दरामुळे नागरिकांना पेट्रोल भरणे ही मुश्कील झाले आहे. परभणीमध्ये गेल्या 10 दिवसांपासून पेट्रोलचे दर 109.66 ते 110.57 रुपये प्रति लीटर या दरम्यान वर-खाली होत आहेत. तर डिझेलचे दर 97.07 ते 97.98 रुपये प्रति लीटर या दरम्यान आहेत. हे वाचा- मारुती कार घेण्यासाठी करावा लागला होता खटाटोप, Tarun Bajaj यांनी सांगितला किस्सा परभणीमध्ये इंधन सर्वात महाग का? परभणी जिल्ह्याला पेट्रोल पुरवठा याआधी मनमाड येथील डेपोमधून केला जात होता. परंतु त्या ठिकाणचं अंतर 620 ते 630 किलोमीटर पडत असल्याने आता परभणीला सोलापूर डेपोशी जोडण्यात आले. परंतु त्या ठिकाणचंही अंतर जवळपास 580 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर कमी होण्यावर त्याचा विशेष परिणाम झाला नाही. परिणाम स्वरूप परभणी जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलचे रेट हे सर्वाधिक असतात. पेट्रोल पंप चालक विनय बांठीया यांनी याबाबत माहिती दिली आहे. हे वाचा- अफगाणिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहते दुबईत, पाहा गडगंज ‘तेलिया’चे PHOTOs देशातील जवळपास 11 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत. या 11 राज्यांच्या यादीमध्ये राजस्‍थान, बिहार, आंध्र प्रदेश, कनार्टक, तेलंगणा, मध्‍य प्रदेश, महाराष्‍ट्र, जम्‍मू आणि काश्‍मीर, ओडिशा, तमिळनाडू आणि लडाख आहे. याशिवाय महानगरांमध्ये देखील दर शंभरीपार आहे. आज देशातील मोठ्या शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. देशातील मोठ्या शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर >> दिल्ली पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 88.92 रुपये प्रति लीटर » मुंबई पेट्रोल 107.52 रुपये आणि डिझेल 96.48 रुपये प्रति लीटर » चेन्नई पेट्रोल 99.20 रुपये आणि डिझेल 93.52 रुपये प्रति लीटर » कोलकाता पेट्रोल 101.82 रुपये आणि डिझेल 91.98 रुपये प्रति लीटर » नोएडा पेट्रोल 98.79 रुपये आणि डिझेल 89.49 रुपये प्रति लीटर » जयपूर पेट्रोल 108.42 रुपये आणि डिझेल 98.06 रुपये प्रति लीटर » भोपाळ पेट्रोल 109.91 रुपये आणि डिझेल 97.72 रुपये प्रति लीटर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात