मुंबई : शेतकऱ्यांना मोटार वापरल्यामुळे वीजबिल खूप जास्त येतं. अशावेळी आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. कमी खर्चामध्ये तुम्ही सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि त्यासोबतच तुमच्या वीजबिलातही बचत करू शकता. तुम्ही शेतकरी असाल किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणाची शेती असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुम्हाला सगळ्यात आधी तर https://www.india.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन तिथे लॉगइन करायचं आहे. तिथे या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्र आणि आधार कार्ड जमा करा. यासोबत बँकेचे डिटेल्सही जोडणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपर्यंत अनुदान देते. त्याचबरोबर 30 टक्के बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊ शकतात. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी सौरपंपाद्वारे शेतात सिंचन करू शकतील.
आनंदाची बातमी! या योजनेंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना 90 टक्के सब्सिडीही योजना आहे सौरपंपाची, जर शेतकऱ्यांनी सौरऊर्जेवर चालणारा पंप बसवला तर त्यांना वीजबिल किंवा डिझेलवर चालणारी मोटर असेल तर डिझेलचा खर्च कमी होईल. सौरपंप वापरल्याने वीजबिलात मोठी कपात होईल आणि महावितरणच्या गलथान कारभारालाही सामोरं जावं लागणार नाही. या योजनेंतर्गत 35 लाख शेतकऱ्यांना सौरपंप देण्याचा सरकारचा मानस आहे. डिझेल पंपापेक्षा सौरपंप घ्यावा यासाठी सरकारकडून जनजागृती केली जात आहे. एवढंच नाही तर 60 टक्क्यांपर्यंत सब्सिडी देखील दिली जात आहे.
सण उत्सवात प्लास्टिक फुलांचाच बोलबाला, शेतकरी संकटात, पाहा Video2 एचपीचा पंप घेतला तरी पुढचे 20 वर्ष चालू शकतो असं कंपन्यांकडून सांगितलं जात आहे. शेतकऱ्यांना ही योजना अगदी फायद्यातलीच आहे. मात्र या योजनेचा लाभ घेताना आधी वेबसाइटवर जाऊन अटी शर्ती आणि इतर माहिती वाचणं आवश्यक आहे.